Sambhavna Seth python in neck video viral about to get bitten  Google
मनोरंजन

Sambhavna Seth: शहाणपणा नडला, अजगर धरायला गेली अन् ..., पहा Viral Video

भोजपूरी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री संभावना सेठ काही दिवसांपासून तिला बाळ होत नाही यावरील तिच्या भावूक नोटमुळे चर्चेत होती.

प्रणाली मोरे

भोजपूरी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री संभावना सेठला(Sambhavna Seth)कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. वादग्रस्त वक्तव्य, ट्रोलिंग आणि आजकाल बाळ होत नसल्यामुळे तिनं लोकांसमोर मांडलेलं तिचं दुःख यामुळे ती सध्या चर्चेत आहे. थायलंड मध्ये सध्या ती पती अविनाश सोबत आयुष्यातील काही सुंदर क्षण एकत्रित राहून घालवत आहे. संभावनाचा युट्युबवर स्वतःचा चॅनेलही आहे. ज्याचं नाव संभावना सेठ एंटरटेन्मेंट आहे. युट्यूबवर थायलंड सीरिजचा पाचवा एपिसोड तिनं नुकताच शेअर केला आहे,ज्यामध्ये ती जगातल्या सगळ्यात मोठ्या अजगराला आपल्या गळ्यात घेऊन आहे,आणि चक्क व्हिडीओ देखील आपल्या चॅनेलसाठी बनवताना दिसत आहे.(Sambhavna Seth python in neck video viral about to get bitten)

हा व्हिडीओ २९ जुलै रोजी संभावना सेठने शेअर केला आहे. आतापर्यंत याच्यावर ८० हजारहून अधिक व्ह्यूज आले आहेत. व्हिडीओमध्ये संभावना सेठ थायलंडवरनं पटायाला जातानाची आपली जर्नी दाखवत आहे. यामध्ये संभावना सेठ सांगत आहे की जेव्हा ती थायलंडा आली, त्याच दिवशी रात्री तिला खूप प्रवासाचा त्रास झाला. तब्येतही बिघडली. पूर्ण दिवस तिनं आराम केला. डॉक्टरांना देखील हॉटेलच्या खोलीवरच बोलावलं गेलं. पुढे ती म्हणतेय,पण डॉक्टरांचे बिल पाहून मला लगेच बरं वाटलं. अर्थातच हे ती मेजेत बोलताना दिसते आहे. एअरपोर्टपासून पटायाचा संभावनाचा प्रवास खूपच कम्फर्टेंबल राहिला असं देखील तिनं सांगितलं आहे,

थायलंडमध्ये अविनाश आणि संभावनाने खूप धमाल केली. त्यानंतर ते वॉटर पार्कला गेले, दोघांनी वेगवेगळ्या प्राण्यांव्यतिरिक्त पायथनचीही भेट घेतली. संभावना सेठने गळ्यात पायथनला घातलं आणि लागली व्हिडीओ बनवायला. मध्ये अचानक तिच्या हातातून पायथनची पकडलेली मान सटकते, तेव्हा पायथन तिच्या हाताच्या दिशेने वळतो पटकन,आणि त्याचं विशाल रुप पाहून संभावनाची चांगलीच घाबरगुंडी उडते. हा व्हिडीओ तिचा नवरा अविनाथ शूट करत होता. संभावना सोबतचा तो भयानक प्रसंग पाहून तिच्या नवऱ्याच्या तोंडावरही बारा वाजतात. पण त्यानंतर पायथनचा ट्रेनर येतो आणि संभावनाची पायथनच्या तावडीतून सूटका करतो. आणि पुन्हा संभावनाच्या हातात पायथनची मान पकडायला देतो.

आणि मग त्या अजगराला गळ्यात घालून संभावना तिचा पूर्ण व्हिडीओ शूट करते. आणि मग तिथल्या इतर प्राण्यांना भेटायला निघून जाते. संभावनाने यावेळी नियॉन रंगाची ओव्हरसाइज हुडी आणि ब्लॅक शॉर्टस घातले आहेत. केसांना मध्ये विभागून तिनं दोन वेण्या बांधल्या आहेत. कमरेवर काळ्या रंगाची बॅग तिनं कॅरी केली आहे. स्पोर्ट्स शूज घालून तिनं आपल्या लूकला एकदम कम्पर्टेंबल ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT