Sana Khan Video Esakal
मनोरंजन

Sana Khan Video: गरोदर सनाला नवऱ्याने ओढत नेलं! नेटकऱ्यांची सटकली...व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

रविवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांनी रमजान निमित्त इफ्तार पार्टी आयोजन केले होते. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या हस्तींनी या पार्टीत हजेरी लावली. या इफ्तार पार्टीत सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंतचे सर्व स्टार्स कलालकार दिसले. ज्यांचे बाबा सिद्दीकी मोठ्या प्रेमाने स्वागत केले.

मात्र या पार्टीत नेटकऱ्यांना एक गोष्ट खुप खटकली. ती म्हणजे सना खानला तिच्या नवऱ्याने दिलेली वागणूक. यापार्टीत मनोरंजन विश्वाला राम राम ठोकलेली सना खानही तिचा पती मुफ्ती अनस सईदसोबत सहभागी झाली होती.

ग्लॅमरच्या जगतातुन बाहेर गेलेली सना ही आता वेगळ्याच रुपात सर्वांना दिसत आहे. सना खानने काही काळापूर्वी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती हे सर्वांनाच माहीत आहे. या गोड बातमीमुळे तिच्यावर चाहत्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षावही झाला होता.

दरम्यान तिने या पार्टीत हजेरी लावल्यावर सहाजिकच तिच्या बेबी बंपवर सर्वाच्चा नजरा होता. तिने बुरखा परिधान केलेला होता. सना खानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने सनाच्या पतीला चांगलचं धारेवर धरलं आहे.

या पार्टीत सना खान पोहोचली तेव्हा तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. मात्र या पार्टीत तिचा पती अनस तिचा हात धरून जोरात चालताना दिसल्याने लोक संतापले. व्हिडिओमध्ये असे दिसून येतं की तो तिला खेचत आहे. सना जोर जोरात धापा टाकत आहे मात्र तिचा नवरा तिच्याकडे न पाहता फक्त तिचा हात धरून ओढतांना दिसत आहे. इतकंच नाही तर सना तिला एवढं चालताही येणार नाही, ती थकली आहे असंही म्हणताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स अनसला चांगलच ट्रोल करत आहे. अनेक युजर्सनी सनाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तर काहींनी त्याला तिची काही चिंता आहे की नाही असं म्हणत टिका केली आहे. त्याबरोबर काही यूजर्सने त्याला पाठिंबाही दिला आहे. तिची तब्येत बरी नसल्याने तिला अनस आत विश्रांतीसाठी घेऊन जात होता असं त्यांच म्हणण आहे. मात्र, या व्हिडिओमागे काय कहानी आहे हे तर हे सना आणि अनसच सांगू शकतात.

Sana Khan Video

आता या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सनाने लिहिले की, हा व्हिडिओ नुकताच माझ्या लक्षात आला. मला माहित आहे की ते पाहणं थोड विचित्र दिसतं आहे. बाहेर आल्यानंतर ड्रायव्हर आणि गाडीचा संपर्क तुटला आणि मी बराच वेळ बाहेर उभी होते. यामुळे मला घाम येऊ लागला आणि अस्वस्थ झाले. त्यामुळे अनसला मला पटकन गाडीच्या आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून मी बसून पाणी पिऊ शकेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devgad Hapus: मुहूर्ताच्या हापूसने खाल्ला विक्रमी भाव, पहिल्या पेटीला २५ हजार; देवगड हापूसने पटकावला मान

राजेशाही थाट अन् सुकामेवा खाणारी 'अनमोल' म्हैस २३ कोटींना, तर १५ कोटींचा 'शाहबाज' घोडा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, टायर पेटवून समृद्धी महामार्ग रोखला

Sugarcane Protest : आमदार यड्रावकरांनंतर आता आवाडेंच्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक अडवली; स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक

Tulsi Ganesha Curse Story: तुळशी मातेला श्रीगणेशाने का दिला होता श्राप? जाणून घ्या पौराणिक कथा

SCROLL FOR NEXT