Sangeeta Bijlani Birthday esakal
मनोरंजन

Sangita Bijlani Birthday : लग्नाची तारीख ठरली, पत्रिकाही वाटल्या! पण...

संगीताचे नाव तिच्या अनेक सहकलाकारांसोबत जोडले गेल्याचे दिसून आले आहे. मात्र यासगळ्या ती एकाच अभिनेत्याच्या नावामुळे जास्त चर्चेत राहिली.

युगंधर ताजणे

Sangeeta Bijlani Birthday : बॉलीवूडची कोणेएकेकाळची सौंदर्यवती आणि अभिनेत्री संगीता बिजलानी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून संगीता ही काही बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये दिसली होती. तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात वावर असणाऱ्या संगीताचा आज जन्मदिवस आहे.

संगीताचे नाव तिच्या अनेक सहकलाकारांसोबत जोडले गेल्याचे दिसून आले आहे. मात्र यासगळ्या ती एकाच अभिनेत्याच्या नावामुळे जास्त चर्चेत राहिली. तो अभिनेता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान. सलमान आणि संगीतामधील प्रेम, त्या प्रेमाच्या गोष्टी या नेहमीच दोन्ही सेलिब्रेटींसाठी वादाचा मुद्दा राहिला आहे. संगीता बिजलानीचं भाईजानवर असणारं प्रेम सर्वश्रृत आहे. ती त्याच्यासाठी वेडी झाली होती.

Also Read -manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

एका मुलाखतीमध्ये संगीतानं तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात तिनं म्हटलं आहे. मी माझ्या करिअऱची सुरुवात मॉडेल म्हणून केली. मिस इंडियाचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या संगीताचं करिअर सलमानमुळे जास्त लाईमलाईटमध्ये आलं होतं. त्यांची वाढती मैत्री ही प्रेमात रुपांतरित झाली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या लग्नाच्या पत्रिकाही वाटून झाल्या. पण त्यानंतर असे काही घडले की, सलमाननं त्या लग्नाला नकार दिला.

संगीता आज ६३ वर्षांची झाली आहे. संगीता आणि सलमान हे दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यावरुन त्यांची मैत्री किती घनिष्ठ होती हे दिसून येईल. त्याची बराचकाळ चर्चाही होती. मात्र सलमाननं त्या मैत्रीला काही विशिष्ट काळापुरतीच मर्यादित ठेवली. सलमान खाननं त्याच्या बिइंग सलमान नावाच्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. २७ मे १९९४ रोजी त्यांचे लग्न होणार होते. मात्र सलमान ऐनवेळी नाही म्हटवा होता.

सलमान आणि सोमी अली यांच्यातील नात्याची कुणकुण संगीताला होती. त्यामुळेच की काय संगीतानं देखील या लग्नाला नकार दिला. त्यानंतर तिनं भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सोबत लग्न केले. त्यांचा संसार १४ वर्ष चालला त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये घटस्फोट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT