Sangram Singh Birthday
Sangram Singh Birthday esakal
मनोरंजन

Sangram Singh Birthday: 8 वर्षे होता व्हीलचेअरवर, पैलवान झालाच!

युगंधर ताजणे

Sangram Singh Birthday: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या स्वभावामुळे वेटलिफ्टर आणि पैलवान संग्राम सिंग हा परिचित आहे. आज तो त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्तानं आपण (Tv Entertainment News) त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाचं नाव उज्जवल करणाऱ्या (Bollywood Actor) संग्रामचा प्रवास मोठा खडतर होता. त्यानं काही काळ अभिनय क्षेत्रामध्ये देखील काम केले आहे. यासगळ्यात त्याला वेगवेगळ्या संकंटांना सामोरं जावं लागलं होतं.

संग्राम हा अनेक रियॅलिटी शोमध्ये देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. (trending News) काही दिवसांपूर्वी संग्राम आणि अभिनेत्री पायल रोहतगी यांचा विवाहसोहळा पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पायल ही सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. कंगनाच्या लॉक अप रियॅलिटी शोमध्ये तिनं केलेल्या विविध खुलाशांना नेटकऱ्यांची दाद मिळाली होती. पायलनं संग्रामशी लग्न केल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

21 जुलै 1985 मध्ये रोहतकमधल्या एका छोट्याशा गावात संग्रामचा जन्म झाला. त्यानं अनेक अडचणींना सामोरं जात आपलं पैलवान होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. संग्रामचे वडिल हे आर्मीमध्ये होते. आता ते निवृत्त झाले असून आई रमादेवी गृहिणी आहे. संग्रामला आठ वर्षे व्हिलचेअरवर बसून राहावे लागले होते. त्याला एक आजार जडला त्यामुळे तो व्हिलचेअरवर होता. मात्र त्यानं हार मानली नाही.काहीही झालं तरी पैलवान व्हायचचं अशी जिद्द त्यानं मनाशी बाळगली होती. अखेर त्यात तो यशस्वीही झाला.

संग्रामला रुमेटोईड नावाचा आजार झाला होता. असे सांगितले जाते. 2015 मध्ये आलेल्या उवा या चित्रपटातून त्यानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो सर्वायवर इंडिया, द अल्टिमेट बॅटल, नच बलिए 7, बिग बॉस सारख्या रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT