Sanjay Dutt has given some advice for Alia Bhatt and Ranbir Kapoor.  Google
मनोरंजन

मुलांना जन्म देण्याविषयी संजयचा रणबीरला खास सल्ला; संसाराचा कानमंत्रही दिला

संजय दत्तचं रणबीर-आलिया दोघांसोबत खूप छान बॉन्डिंग शेअर करतो.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) च्या लग्नाची बातमी दूर-दूरपर्यंत पसरलीय,आणि या लग्नसराईचा आनंद नकळत सारेच अनुभवत आहेत. सगळेच रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी बोलत आहेत. आता 'KGF Chapter 2' सिनेमात 'अधिरा' ही व्यक्तिरेखा साकारतना दिसणारा अभिनेता संजय दत्तने(Sanjay Dutt) देखील रणबीर-आलियाला लग्नाविषयीच्या चार चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. तसं पहायाला गेलं तर,रणबीर-संजय दत्तमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. अर्थात असणारंच नाही का. रणबीरनं पडद्यावर इतका हुबेहूब संजय दत्त जो साकारला होता. राजकुमार हिरानीच्या 'संजू' सिनेमात रणबीरला संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारताना पाहून सगळेच थक्क झाले होते. रणबीरनं त्यावेळी संजय दत्तचे चेहऱ्यावरचे हावभाव,देहबोली हे सगळं एकदम परफेक्ट उचललं होतं. आणि लोकांचं एकदम मस्त मनोरंजन केलं होतं. तर,आलिया भट्टनंही संजय दत्तसोबत 'सडक 2' सिनेमात काम केलं आहे. तर चला,रणबीर-आलियाला नेमकं संजय दत्तनं लग्नाचा खास कोणता मंत्र सांगितलाय तो जाणून घेऊया.

संजय दत्त सध्या 'KGF Chapter 2' च्या प्रेमोशनमध्ये बिझी आहे. हा सिनेमा १४ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात संजय दत्त सोबत रविना टंडन,यश आणि श्रीनिधी शेट्टी देखील दिसणार आहेत. याच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान संजयला रणबीर-आलियाच्या लग्नावरनं प्रश्न विचारला असता त्यानं खास अंदाजात उत्तर दिलं आहे. प्रश्न विचारल्यावर पहिल्यांदा तर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. जणू काही त्याला हे पहिल्यांदाच कळत आहे. तो म्हणाला,''ते दोघे खरंच लग्न करीत आहेत? असं असेल तर मला खूप आनंद झाला आहे हे ऐकून. आलिया तर माझ्यासमोरच जन्माला आली आणि तिला मी लहानाचं मोठं होतान पाहिलंय. लग्न एक मोठी जबाबदारी आहे. लग्न बांधिलकी आहे जी एकमेकांसोबत जपायची असते,आणि आपण जी वचनं एकमेकांना लग्नात देतो त्यावर कायम ठाम रहायचं असतं. एकमेकांना सोबत करायची असते. आनंद आणि शांतीनं आपलं आयुष्य पुढे न्यायचं असतं''. एवढ्यावरंच संजय दत्त थांबला नाही तर रणबीरला खास तो म्हणाला,''लवकर मुलांना जन्म दे आणि आनंदी रहा आयुष्यात''.

तसं पाहिलं तर लग्नानंतर खरं आयुष्य सुरु होतं. अनेक तडजोडी कराव्या लागतात,अडणी येतात. पण सगळ्या परिस्थितीत एकमेकांची सोबत देणं गरजेचं असतं. तो एक टास्क असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जेव्हा संजयला विचारलं गेलं की तू रणबीर-आलियाला काय सल्ला देशील? त्यावर अभिनेता म्हणाला,''दोघांनी नात्यात समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. खूप अडचणी येतील आणि जातील. पण त्यासमोर आपण स्वतःला हरू द्यायचं नाही. मी फक्त त्यांना लग्नानंतर येणाऱ्या अडचणींचा मिळून सामना करा आणि परिस्थितीनुसार आपल्या नात्याला टिकून ठेवण्यासाठी वागा. कारण पुढे आयुष्यभर त्यांना लग्नात एकमेकांना दिलेली वचनं लक्षात ठेवून वागायचं आहे. हीच खरी सुखी वैवाहिक जीवनाची सूत्र आहेत'' असं संजय दत्त म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT