Sanjay Leela Bhansali and Salman Khan
Sanjay Leela Bhansali and Salman Khan Sakal
मनोरंजन

Salman Khan: भन्साळी आणि भाईजानमध्ये झाला होता राडा, सलमानने मधेच सोडलं होतं 'इंशाअल्लाह'चं शूटींग कारण होत...

सकाळ डिजिटल टीम

भाईजानसाठी असं म्हटलं जातं की त्याला खूप लवकर राग येतो. पण ते तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी मोठे घडलेले असते. 2019 मध्ये संजय लीला भन्साळी यांनी 'इंशाअल्लाह' चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले. सलमान खान आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार होता. पण मध्येच चित्रपट अपूर्ण राहिला.

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट म्युझिकल ड्रामा चित्रपट होता. पण भन्साळी आणि सलमानमध्ये माहित नाही मधेच काय झाले, ज्यामुळे शूटिंगच्या मध्येच भाईजानने सेट सोडला का? आणि त्यानंतर भन्साळींना त्यांच्या चित्रपटासाठी एकही नायक सापडला नाही. शेवटी त्यांनी हा चित्रपटच रद्द केला.

चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर रुपिन सुचक यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. रुपिन सांगतात की सलमान आणि आलिया 'इंशाअल्लाह' मध्ये दिसणार होते पण 2019 मध्येच शूटिंग सुरू असतानाच हा चित्रपट रद्द झाला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुपिनने सांगितले की "हा एक आधुनिक चित्रपट होता, ज्याची विचारसरणी आणि दृष्टीकोन दोन्ही अगदी आधुनिक होते".

"पण चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. भन्साळी आणि सलमानमध्ये वाद झाला आणि भाईजान सेटवरून निघून गेला. दोघांनाही एकमेकांसोबत चित्रपट करायचा नव्हता. भन्साळी सरांसह मी वर्षभर पूर्वनियोजन केले होते. लोकेशनसाठी आम्ही दोघे तीन महिने अमेरिकेत राहिलो".

रुपिनने सांगितले की, "मी चित्रपटासाठी २४ सेट डिझाइन केले होते, तेही नऊ महिन्यांत. आम्ही तीन सेट बनवायला सुरुवात केली, त्यापैकी एक पूर्णपणे तयार होता. आलियासोबत आम्ही शूटिंगला सुरुवात केली. दुसरा सेटही तयार होणार होता आणि येत्या तीन दिवसांत शूटिंग होणार होते, पण अचानक सगळं संपल".

निर्माता जयंतीलाल गधा यांनी 2022 मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यात बरेच रचनात्मक मतभेद होते, ज्यामुळे चित्रपट रद्द झाला.

मात्र, त्यानंतर काय झाले, याबाबत मला संपूर्ण माहिती नाही. त्याऐवजी गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग सुरू झाले. इतकेच नाही तर सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांनी मुलाखतीत एकमेकांना सांगितले होते की दोघेही मित्र आहेत. पण कदाचित काळानुसार माणसं बदलतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : 'अब 400 पार'ला लागले ग्रहण! अजूनही भाजप बहुमतापासून दूर, इंडियाकडे काय आहे कल?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या रिंगणातील कलाकारांची प्रतिष्ठा पणाला; कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? जाणून घ्या एक क्लिकवर

Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT