Sanjay Leela Bhansali Bollywood Director
मनोरंजन

'तो आता खूप बदललाय'; भन्साळींचे 'या' अभिनेत्यासोबत काम करण्याचे संकेत

सकाळ डिजिटल टीम

'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' सारख्या प्रोजेक्टसवर एकत्र काम केल्यानंतर, संजय लीला भन्साळी आणि सलमान खान 'इंशाअल्लाह' साठी पुन्हा एकत्र येणार होते. मात्र, काही कारणास्तव हा चित्रपट रखडला.

एका न्यूज पोर्टलला नुकत्याच दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीत, चित्रपट निर्मात्याने 'दबंग' स्टारसोबत पुन्हा काम करण्याच्या शक्यतेबद्दल खुलासा केला. भन्साळी (Sanjay Leela Bhansali) म्हणाले की, ''सलमान माझा प्रिय मित्र आहे आणि मला त्याच्यासोबत ‘पद्मावत’ नंतर काम करायचे होते.'' (Sanjay Leela Bhansali says Salman Khan has changed)

Sanjay Leela Bhansali-Salman Khan

पुढे स्पष्ट करताना, चित्रपट निर्मात्याने जोडले की ते घडण्यासाठी त्याने पूर्ण प्रयत्न केले. पण, काही गोष्टींमुळे इच्छेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''आपण सगळे लोक बदलतो आणि सलमानही बदलला आहे. सलमानच्या (Salman Khan) मनातही तो बदलला आहे'' असेही तो पुढे म्हणाला.

''मला सुपरस्टारबद्दल अत्यंत आदर आहे'' असे भन्साळींनी शेवटी सांगितले. मात्र, त्याच्यासोबत काम करायचे की नाही हे पूर्णपणे आता त्यांच्या हातात आहे.

‘इंशाअल्लाह’ मध्ये सलमान आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पहिल्यांदाच एकत्र येणार होते. जेव्हा हा चित्रपट थांबला तेव्हा भन्साळींनी आलियासोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ हा आणखी एक प्रोजेक्ट पुढे केला.

Sanjay Leela Bhansali-Salman Khan

दरम्यान, वर्क फ्रंटवर, सलमान पुढे मनीष शर्माच्या 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय त्याच्याकडे जॅकलीन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) 'किक 2' आणि पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) 'कभी ईद कभी दिवाळी' देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT