sanjay narvekar drama sakal
मनोरंजन

संजय नार्वेकर यांच्यावर का आली ''चमत्कार'' करण्याची वेळ...

नीलेश अडसूळ

मनोरजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले, मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच मालिका विश्वतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारे अष्टपैलू विनोदी अभिनेते संजय नार्वेकर (sanjay narvekar) एक नवा चमत्कार घेऊन रसिकांसमोर आले आहेत. हा चमत्कार म्हणजे भलतंसलतं काही नसून त्याची एक नवी आणि आगळीवेगळी कलाकृती आहे. या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी ते रंगभूमीवर पुन्हा परतले आहे.

संजय नार्वेकर यांचे “चमत्कार”हे बालनाट्य लवकरच प्रेक्षकभेटीला येत आहेत. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित “चमत्कार” हे बालनाट्य रंगभूमीवर वेगळाच चमत्कार घडवणार आहेत. या नाटकाचा शुभारंभ १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.

बालनाट्य म्हटले की गमती जमती, चमत्कार, गिमिक्स हे आलेच. ‘चमत्कार’ हे नाटक अभ्यास हया विषयावर अवलंबून आहे. घरात पैसा आहे म्हणजे सगळं काही, अशी समज असणारे आई बाबा आपल्या मुलांना अभ्यासापासून नेहमी परावृत्त करत असतात. हया त्रासाला कंटाळलेली मुलं आपल्या आई बाबांचा कसा विरोध करतात. त्यांना त्रास देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. त्यातूने ज्या काही गमती जमती, चमत्कार घडतात, ते हया नाटकात पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे लेखन, लोकप्रिय विनोदी अभिनेते संजय नार्वेकर यांचा अभिनय, ऋषिकेश घोसाळकर यांचे दिग्दर्शन आणि दर्जेदार बालनाट्यासाठी प्रसिध्द असलेली साईराज नाट्यसंस्था असा दुग्धशर्करा योग हया नाटकाद्वारे जुळून आला आहे. लेखक – दिग्दर्शक व निर्माते ऋषिकेश घोसाळकर यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय बालनाटये व व्यावसायिक नाटकं सादर केली आहेत. त्यांचे “हरी आला दारी” हे व्यावसायिक नाटक खुपच लोकप्रिय झाले होते. “चमत्कार” हे त्यांचे १२ वे व्यावसायिक नाटक आहे.

“चमत्कार” या नाटकातून त्यांनी आजच्या मुलांचं भावविश्व साकारलं असून मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते संजय नार्वेकर यात प्रमुख भूमिकेत असून सोबत हिमांगी सुर्वे, प्रियांका कासले, चिंतन लांबे, संदेश अहिरे, प्रणाली बोराले, नेहा चव्हाण, अर्चित टक्के, सुधांशु कुलकर्णी, नीलिशा लाड, स्वरा वाडकर, मानस वसाने, उर्वी पटेल, मनवा वसाने, तीर्थ पटेल हे कलाकार दिसणार आहेत. चमत्काराबरोबरच फूल टू मनोरंजन करणारे हे बालनाट्य लहानमुलांसह मोठ्यांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT