santosh juvekar shared video and said how reels are important  sakal
मनोरंजन

कितीही काम केलं तरी.. संतोष जुवेकरची ही पोस्ट चुकवूनही चुकवू नका..

अभिनेता संतोष जुवेकरचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

नीलेश अडसूळ

santosh juvekar : झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो.सध्या त्यांचे बरेच आगामी प्रोजेक्ट सुरू आहेत. अशातच त्याने एक महत्वाची पोस्ट केली आहे. एक विडिओ शेअर करत त्याने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (santosh juvekar shared video and said how reels are important )

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. म्हणजे आपण सतत विविध माध्यमांवर ऑनलाईन असतो, आणि आपलं मनोरंजन करत असतात त्या रिल्स. आज कित्येक मंडळी रिल्स करून लोकांचे मनोरंजन करत आहेत किंबहुना हे एक अर्थार्जनाचे साधनच बनले आहे. त्यामुळे जो तो सध्या रिल्स बनवण्याकडे वळत आहे. याच रिल्स बाबत संतोष जुवेकर ने काहीशी मिश्किल पोस्ट लिहिली आहे.

त्यानेही एक रील शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये संतोष एकटक बघत असल्याचं दिसत आहे. याला एक भन्नाट कॅप्शन त्याने दिलंय. तो म्हणतो “नजरेला नजर लागू नये म्हणून हा नजरेला लावलेला काळा टिक्का. ते म्हणतात कितीही काम केलं तरी हे असे व्हिडीओ बनवा. कारण आज काल म्हणे रिअलमध्ये नाही दिसलात तरी चालेल पण रिलमध्ये दिसणं महत्त्वाचं. काय बोलायचं आता सांगा? अहो सांगा खरंच करा कमेंट आणि.. हाना नाहीतर आपलं म्हणा.” असं संतोषने म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

SCROLL FOR NEXT