Sara Ali Khan
Sara Ali Khan 
मनोरंजन

Sara Ali Khan : 'खरं सांग बॉयफ्रेंडचं नाव काय?' कपिलच्या प्रश्नावर साराचा 'सिक्सर'!

युगंधर ताजणे

Sara Ali Khan Bollywood Actress Vicky Kaushal Kapil : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. सध्या तिचा विकी कौशल सोबत जरा हटके जरा बचके नावाचा चित्रपट आला आहे. ते सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात साराचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

सारा अली खान ही कपिल शर्मा शो मध्ये आली होती. त्या एपिसोडची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. फक्त साराच नाही तर तिच्यासोबत विकी कौशल देखील त्या शोमध्ये सहभागी झाला होता. साराच्या या चित्रपटानं तीन दिवसांत २२ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत असल्याचे दिसून आले आहे. सारा आणि विकीनं त्यांच्या त्या नव्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. त्याचा परिणाम की काय त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

यावेळी सारानं कपिलच्या शोमध्ये एक खुलासा केला. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. विकीनं सांगितलं की, एकदा सारा तिच्या आईला अमृता सिंगला खूप ओरडत होती. त्यावर सारानं सांगितलं की, अमृता सिंग यांनी सोळा रुपयांचा टॉवेल खरेदी केला होता. त्यामुळे तिचा ओरडा तिला खावा लागला होता.यानंतर अभिनेत्रीनं खुलासा केला आहे की, आपण इंडस्ट्रीतील सगळ्यात कंजूष अभिनेत्री होती. चहा बनवताना देखील जवळ दोन ते तीन टी बॅग ठेवते.

साराच्या त्या खुलाशानं विकी आणि कपिलला हसू आवरत नाही. त्या प्रोमोचा व्हिडि व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सारावर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तू एवढी श्रीमंत पण चहा बनविण्यासाठी अशा प्रकारचा कंजूषपणा बरा नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच यावेळी कपिलनं साराला विचारलं तुझा बॉयफ्रेंड कोण, यावर तिनं कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यावर सारानं कपिलला म्हटलं, आजकाल माझा बाण काही निशाण्यावर लागत नाही. त्यानंतरही प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता.

काही दिवसांपासून साराचे नाव हे भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत घेतले जात होते. त्यांच्या डेटिंगच्या चर्चाही व्हायरल झाल्या होत्या. मात्र यावर या दोघांनीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे चाहते आणि नेटकऱ्यांनी त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली होती. सध्या त्या दोघांनीही एकमेकांना इंस्टावर अनफ्रेंड केल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT