Sara Ali Khan ,Amrita Singh Google
मनोरंजन

साराचे आईसोबतचे फोटो पाहिलेत का? सोशल मीडियावर त्यावरुन उडालाय गोंधळ

अभिनेत्रीनं आई अमृता सिंगच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली पोस्टही चर्चेत

प्रणाली मोरे

अभिनेत्री सारा अली खानची (Sara Ali Khan)आई अमृता सिंगनं (Amruta Singh) आज ६४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांनी पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपल्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हटके पोस्ट शेअर करीत आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचे छान-छान फोटोज शेअर केले आहेत. ज्या फोटोंमध्ये तिने आईच्या तारुण्यातील काही फोटोना एकत्र करुन सेम टू सेम आईच्या फोटोशी साधर्म्य साधतील असे स्वतःचे फोटोही त्या फोटोसोबत शेअर केले आहेत. त्या फोटोना पाहून दोन सेकंद कळत नाही की यातील सारा कोण आणि अमृता कोण. इतकी सारा आता अमृता जशी तिच्या तरुणपणी दिसायची तशी दिसते आहे.

या फोटोना शेअर करत सारानं कॅप्शन दिलंय की,''हॅप्पी बर्थडे मम्मी. मला कायम चांगली शिकवण,प्रोत्साहन दिल्याबद्दल तुझी मी आभारी आहे. तुला माझा कायम अभिंमान वाटेल असं काम मी करेन. आणि तुला आनंदात ठेवण्याचा मी प्रयत्न करेन''. अशी एकंदरीत ती पोस्ट आहे. सारा अली खान आणिअमृता सिंगच्या या फोटोना सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. साराच्या या पोस्टवर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देताना अमृता सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारा अली खान आता आदित्य धर दिग्दर्शित 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' या सिनेमात विकी कौशल सोबत दिसणार आहे. हा सिनेमा महाभारतातील योद्धा अश्वत्थामा वर आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यानं केली आहे. लक्ष्मण उतेकरच्या सिनेमातही सारा आपल्याला दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : भाजप नेते मोहित कंबोज यांचा गणपती विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

Latest Maharashtra News Updates : गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन

Ganpati Visarjan 2025 : उमरग्यात शाळकरी मुलांनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर गणरायाला दिला निरोप

SCROLL FOR NEXT