Sara Ali Khan dating Cricketar Shubman Gill Instagram
मनोरंजन

Sara Ali khan Photo: शुभमनच्या गावापर्यंत पोहोचली सारा अली खान?,समोर आलेल्या फोटोनं चर्चेला उधाण

एका पंजाबी चॅट शो मध्ये क्रिकेटर शुभमन गिलने सारा अली खान सोबतच्या नात्यावर मौन सोडल्यानंतर तेव्हापासून जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे.

प्रणाली मोरे

Sara Ali khan: सारा अली खानच्या एका लेटेस्ट फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तो फोटो एका गावाकडचा वाटतोय. सारा त्या फोटोत गावाकडे जशा खाट असतात त्यावर बसून पोझ देतान दिसत आहे. तिच्या त्या फोटोला पाहून लोक मात्र कन्फ्यूज झाले आहेत.

काही लोकांनी कमेंट केली आहे की ती क्रिकेटर शुभमन गिलच्या गावाला गेली आहे. सारा अली खान आणि शुभमनच्या डेटिंगची सध्या जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. एका पंजाबी चॅट शो मध्ये शुभमनने याविषयी हिंट देखील दिल्याचं समोर आलं आहे. पण साराचे हो फोटो शुभमनच्या गावातले आहेत की आणखी कुठले आहेत,चला जाणून घेऊया सविस्तर याविषयी.(Sara Ali Khan dating Cricketar Shubman Gill)

सारा अली खान आपल्या इन्स्टाग्राम फॉलोअर्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच इंट्रेस्ट्रिंग पोस्ट शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच तिनं काही फोटो पोस्ट केले आहेत. चार फोटोंमधील तीन फोटो तर तिचे खाटेवरच बसलेले आहेत. तर एक फोटो शेतात बसून काढलेला आहे. साराने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे आणि ती त्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. लोकांनी त्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,' हे शुभमन गिलचे गाव दिसत आहे'. लोकांनी तिच्या साडीची देखील प्रशंसा केलेली आहे.

सारानं आपल्या त्या इन्स्टा पोस्टला कोणतं कॅप्शन दिलेलं नाही. ना तिनं आपल्या लोकेशनचा खुलासा केलेला आहे. आता समोर येतंय की ते तिचं शूटिंग लोकेशन आहे. सारा अली खान लक्ष्मण उतेकरच्या सिनेमात लवकरच दिसणार आहे. तिच्यासोबत विकी कौशल देखील आहे. सिनेमाच्या नावाविषयी अद्याप खुलासा झालेला नाही.

शुभमन गिलशी साराचं असलेल्या कनेक्शनविषयी बोलायचं झालं तर एका चॅट शो मध्ये त्याला विचारलं गेलं की,'तो साराला डेट करत आहे का? ',त्यावर शुभमन म्हणाला होता, ''कदाचित हो,कदाचित नाही''. आणि हेच त्याचं उत्तर वाऱ्यासारखं सगळीकडे पसरलं अन् लगोलग सारासोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक' लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT