sara tendulkar Team esakal
मनोरंजन

सचिनची 'लाडकी सारा', मेकअप बिघडल्यानं नाराज; व्हिडिओ व्हायरल

मास्टर ब्लास्टर सचिनचं (sachin tendulkar) नाव जगभरात प्रख्य़ात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिनचं (sachin tendulkar) नाव जगभरात प्रख्य़ात आहे. क्रिकेटपासून तो लांब गेला असला तरी तो चाहत्यांशी सोशल मीडियावरुन संपर्कात आहे. सचिनबरोबर त्याची मुलंही आता सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असल्याचे दिसुन आले आहे. सारा (sara tendulkar) आणि अर्जुन (arjun tendulkar) ही त्याच्या मुलांची नावे आहे. त्यापैकी सारा ही नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेयर करुन चाहत्यांची पसंती मिळवत असते. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची सध्या चर्चा आहे. (sara tendulkar shares her latest video viral fans go crazy yst88)

साराला सोशल मीडियावर लाखोच्या संख्येनं फॉलोअर्स आहेत. सारा तिच्या ब्युटीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती चर्चेत असते. आपले फोटो, व्हिडिओ पोस्ट करुन ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आता साराच्या मेकअपचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ती आपल्या केसांमुळे त्रासली आहे. पुन्हा काही क्षणात तिचा लूक चेंज होतो. आणि तिला कमालीचा आनंद होतो. असे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपासून सारा ही चित्रपट क्षेत्रात येणार असल्याची चर्चा होती. अजूनही अनेकांनी असा अंदाज बांधला आहे की, सारा बॉलीवूडमध्ये येणार आहे. मात्र त्याबद्दल तिच्या घरच्यांकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तिच्या चाहत्यांनी तिला बॉलीवूडमध्ये यावं अशी यापूर्वी अनेकदा विनंती केली होती.'मेडल जिंकलो तरच भारतीय नाही तर नेपाळी, चायनीज'; मिलिंदच्या पत्नीचं ट्विट

आताच्या व्हिडिओमध्ये सारानं ब्लॅक कलरचा एक टॉप परिधान केला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना तिनं लिहिलं आहे की, ‘खुद से थोड़ा प्यार' साराच्या त्या व्हिडिओला आतापर्यत दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील त्यावर कमेंट केल्या आहेत. प्रसिद्ध गायिका कनिका कपूरनं त्या पोस्टवर काही इमोजीही शेयर केल्या आहेत. हर्षदीप कौरनं प्रिटी वुमन असे लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT