NMACC Day 2 Esakal
मनोरंजन

NMACC Day 2: अंबानींच्या कार्यक्रमात हॉलिवूडकर साडीत अन् बॉलिवूड कलाकारांची विचित्र फॅशन!

Vaishali Patil

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटन कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या कलाकारांचा मेळा भरलेला दिसला. 

सलमान खान, रेखा, जान्हवी कपूर, दिशा पटनी, श्रद्धा कपूर, गौरी खान, प्रियांका चोप्रा, आर्यन खानपासून बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले. 

हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 'इंडिया इन फॅशन' नावाने आयोजित करण्यात आला होता.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर लॉन्चमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरही पोहोचली. दुसऱ्या दिवशी भूमी सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये कार्यक्रमात पोहोचली. मात्र तिचा ड्रेस पाहून सर्वांनाच धक्का बसला. 

भूमी पेडणेकरची ही स्टाईल सध्या व्हायरल झाली. सोशल मीडियावरही तिच्या ड्रेसची खूप चर्चा होत आहे. अनेकजण त्यांची खिल्ली उडवत आहेत.

आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या मंगेतरसोबत दिसली. तर राजकुमार राव, पत्रलेखा आणि करण जोहरही कार्यक्रमाला पोहोचले.

करण जोहर त्याच्या वेगळ्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. कार्यक्रमादरम्यान करणही एका खास ड्रेसमध्ये दिसला. त्याने वेगळ्या प्रकारची शेरवानी घातली होती.

तर क्रिती आणि मौनीच्या लूकचीही सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

नीता आणि मुकेश अंबानी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलीवूडसह अनेक हॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली. गिगी हदीद आणि झेंडायासारखे स्टार्स दिसले.

लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता आणि स्पायडर मॅन, द इम्पॉसिबल सारख्या चित्रपटात दिसलेला टॉम हॉलंड देखील अंबानींच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. 

त्यावेळी समोर आलेल्या फोटोमध्ये तो पांढऱ्या शर्टसह काळ्या सूट-पँटमध्ये दिसून आला.

स्पायडर-मॅनमध्ये टॉमसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणारी लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री जेंडाया देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिने साडी नेसलेली दिसली. तर गिगी हदीदही या सोहळ्याचा एक भाग बनली. 

जेंडायासोबत तिनेही साडीतही दिसली. ती गोल्डन कलरच्या बॉर्डर साडीत दिसत आहे. यासोबत तिने सोन्याच्या रंगाच्या बांगड्याही हातात घेतल्या आहेत.

 त्याच्या फॅशनवरुन त्यांनी भारतीय संस्कृती जपल्याचं दिसतय मात्र बॉलिवूडमधील काही कलाकारांची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT