Nilanjala ray  esakal
मनोरंजन

निलांजना रे ठरली 'सारेगमपा 2022' ची विजेती

Sa Re Ga Ma Pa 2022 Winner: टीव्ही मनोरंजन (Tv Entertainment) विश्वामध्ये चाहत्यांच्या आवडीचा शो म्हणून सारेगमपाची वेगळी क्रेझ (Entertainment News) आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sa Re Ga Ma Pa 2022 Winner: टीव्ही मनोरंजन (Tv Entertainment) विश्वामध्ये चाहत्यांच्या आवडीचा शो म्हणून सारेगमपाची वेगळी क्रेझ (Entertainment News) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शोनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. यंदाच्या सारेगमपाचा अंतिम सोहळा नुकताच पार (Sa Re Ga Ma Pa Grand Finale) पडला. यावेळचा विजेतेपदाचा मान निलांजना रे (neelanjana ray) ला मिळाला आहे. तिनं विजेतेपद मिळवून चाहत्यांची पसंती मिळवली आहे. निलांजननं बहारदार गायकीनं चाहत्यांकडून दाद मिळवली होती. कित्येकांना तिलाच विजेतेपद मिळणार याबद्दल खात्री होती. अखेर अंतिम सोहळ्यात तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर राजश्री दुसऱ्या आणि शरद शर्मा यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पर्धकाला अनुक्रमे पाच आणि तीन लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे तर निलांजनाला दहा लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या हस्ते निलांजनला विजेतेपदाच्या रकमेचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली. नेटकऱ्यांनी देखील तिच्या विजेतेपदाचा आनंद व्दिगुणीत केला आहे. तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सारेगमपाविषयी सांगायचे झाल्यास (Sa Re Ga Ma Pa) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या आवडीचा शो आहे. त्याला कोट्यवधी प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे. त्यातून अनेक प्रसिद्ध गायक बॉलीवूडला मिळाले आहेत.

विजेतेपद मिळवल्यानंतर निलांजनाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. त्यांचे प्रेम आणि सहकार्य यामुळे मला विजयी होता आले. आतापर्यत केलेल्या कष्टांचे चीज झाले आहे. परिक्षकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन याचाही फायदा मला यावेळी झाला. यापुढील प्रवास हा आणखी खडतर असेल मात्र तेव्हाही मला चाहत्यांचा पाठींबा आणि आशीर्वाद असेल यात शंका नाही. अशी भावना निलांजनानं व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: नांदेड-हजरत निजामुद्दीन रेल्वेच्या विशेष फेऱ्या; उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

UP Tourism: हत्तींचं 'नवं घर' तयार!! युपीत एलिफंट रिझर्व्हला मंजुरी; शेतकऱ्यांनाही मिळणार मोठा दिलासा

Panchang 5 April 2026 : रविवारचा दिवस खास! शुभ मुहूर्त, राहुकाल आणि तिथी जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ५ एप्रिल २०२६

Marathi Literature Childhood Stories : ‘पांढऱ्या आजोबां’ची आठवण

SCROLL FOR NEXT