satarcha salman, hemant dhome sakal
मनोरंजन

Satarcha Salman: शाहरुखचा 'पठाण' झाला, आता मराठी मातीतला 'सातारचा सलमान' येतोय..

हेमंत ढोमे दिग्दर्शित सातारचा सलमान सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Satarcha Salman Marathi Movie News: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाणने बॉलिवूड गाजवलं. पठाणने १००० कोटींची कमाई केली.

आता मराठी मातीतला सलमान येतोय. हेमंत ढोमे दिग्दर्शित सातारचा सलमान सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

आपणही मोठ्या पडद्यावर झळकावे, हिरो बनावे, असे स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. काहींचे सत्यात उतरते तर काहींचे स्वप्नच राहते. असेच हिरो बनण्याचे स्वप्न एका खेड्यातील सामान्य तरुणाने पाहिले आहे.

(satarcha salman marathi movie trailer out now)

'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!' अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड आणि अखेर त्याचे त्याची स्वप्नपूर्ती होते का? हे आपल्याला येत्या ३ मार्च रोजी समजणार आहे.

प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित ‘सातारचा सलमान' या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक दिसत आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट धमाल मनोरंजक असणार याचा अंदाज ट्रेलरवरूनच येत आहे.

ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतोय. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेली मदत यात दिसत आहे.

मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का, याचे उत्तर मात्र 'सातारचा सलमान' पाहिल्यावरच मिळणार आहे. ३ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT