Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 4 Esakal
मनोरंजन

Satya Prem Ki Katha: महाराष्ट्राचं राजकारण मनोरंजक झालेलं असतांना कार्तिक कियाराच्या चित्रपटाच्या कमाईत जबरी वाढ!

Vaishali Patil

 Satya Prem Ki Katha BO Collection Day 4: रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. हे राजिकय नाट्यांतर कुण्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असं काहीसं घडलं. सध्या बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सुरवातीला या चित्रपटाने कमी कमाई करत ओपनिंग केली असली तर या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा सत्यप्रेम की कथा ही हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. हा चित्रपट 29 जून रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पुन्हा एकदा कार्तिक-कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे.

समीर विद्वांसच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाच्या वीकेंडच्या कमाईचे आकडे आता समोर आले आहे. 2 जुलै म्हणजेच रविवारी 'सत्यप्रेम की कथा' ने किती कलेक्शन केले त्याचे आकडेही समोर आले आहेत.

समोर आलेल्या आकडेवारी नुसार या चित्रपटाने रविवारी बॉक्स ऑफिसवर 12 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर 9.5 कोटींचा गल्ला जमावला तर दुसऱ्या दिवशी 7 कोटींची कमाई झाली. शनिवारपासून चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला आणि कमाईत वाढ झाली. त्याचबरोबर शनिवारी या चित्रपटाने 10.10 कोटींची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 38.35 कोटींवर गेली आहे.

'सत्यप्रेम की कथा'मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीशिवाय सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्या भुमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT