satyashodhak marathi movie tax Free in maharashtra Cm eknath shinde announcement drj96 SAKAL
मनोरंजन

Satyashodhak: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा करमुक्त केल्याची घोषणा केलीय

Devendra Jadhav

Satyashodhak Movie News: सध्या अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा सत्यशोधक सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

या सिनेमाचं लोकं तर कौतुक करत आहेतच पण अनेक राजकीय नेतेही सत्यशोधक सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा करमुक्त केल्याची घोषणा केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केलीय.CMO एकनाथ शिंदेंनी ट्विटरवर

'सत्यशोधक' मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी

असं जाहीर करुन ही घोषणा केलीय. यामुळे सत्यशोधक सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक लोकं सत्यशोधक सिनेमा पाहतील

या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय

'सत्यशोधक' चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे. तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत.

या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि महात्मा जोतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक अमित राज यांचे संगीत लाभले असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर फातर्फेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.

सत्यशोधकची लोकप्रियता शिगेला

समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे,प्रतिका बनसोडे आणि प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT