Scam 2003 The Telgi Story Review  esakal
मनोरंजन

Scam 2003 The Telgi Story Review : शेवटी तेलगीनं सगळ्यांची पोलखोल केली, पैशांची हाव स्वस्थ बसू देईना!

आता हंसल मेहता यांनी स्कॅम २००३ या मालिकेतून पुन्हा एका धक्कादायक विषयाची मांडणी करत जाणकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Scam 2003 Review : प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कॅम १९९२ या मालिकेची सगळ्यांना ओळख आहेच. या मालिकेनं एका वेगळ्या विषयाची पोलखोल केली होती. हर्षद मेहता नावाच्या शेयर मार्केटमधील एका व्यापाऱ्यानं तब्बल चार हजार कोटींचा घोटाळा केला होता. त्यानं सारा देश हादरुन गेला होता.

आता हंसल मेहता यांनी स्कॅम २००३ या मालिकेतून पुन्हा एका धक्कादायक विषयाची मांडणी करत जाणकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या मालिकेतून त्यांनी त्याकाळी गाजलेल्या आणि चर्चेत आलेल्या अब्दूल करीम तेलगी प्रकरणाविषयी वेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. या व्यक्तीनं ३० हजार कोटींचा स्टॅम्प घोटाळा केला होता. भारतातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून त्याकडे पाहिले जाते.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सोनी लिव्हवर हंसल मेहता दिग्दर्शित ही मालिका आता प्रदर्शित झाली आहे. स्कॅम २००३ ही दहा एपिसोडची मालिका असून आता सध्या त्यातील पाच एपिसोड हे स्ट्रीम झाले आहेत. पुढील पाच एपिसोड हे नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. हंसल मेहता यांचे दिग्दर्शन असलेली ही मालिका न चुकवावी अशी आहे. त्यातून त्यांनी भारतामध्ये काय होऊ शकते, त्या घटनेला जर आणखी काही गोष्टींचा पाठींबा मिळाल्यास त्याचे स्वरुप किती मोठे असू शकते याचा अंदाज येतो.

तेलगीनं जो घोटाळा केला होता त्यानं देशातील न्याय व्यवस्था देखील पूर्णपणे हादरुन गेली होती. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणता घोटाळा झाल्याची माहिती नव्हती. मेहता यांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक या सीरिजच्या माध्यमातून वेगळ्या विषयाचा परिचय प्रेक्षकांना करुन दिला आहे. प्रसिद्ध पत्रकार संजय सिंग यांच्या तेलगी स्कॅम नावाच्या पुस्तकावर आधारित या मालिकेनं सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांना व्यक्त होण्यास भाग पाडले आहे. तेलगी प्रकरणावर मेहता यांनी वेबसीरिजचे जे धाडस दाखवले आहे त्याचे कौतुक होत आहे.

Scam 2003 The Telgi Story Review

एका सर्वसामान्य कुटूंबातून आलेल्या तेलगीनं साऱ्या देशाला आपल्या कृत्याची दखल घेण्यास भाग पाडले. त्याचे वडील इंडियन रेल्वे खात्यात होते. वडीलांच्या निधनानंतर कौटूंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यातून तेलगीनं त्याचे पदवीपर्यतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र त्याला नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे निराश झालेल्या तेलगीनं रेल्वेतच फळं विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता.

रेल्वेत फळं विकणारा तेलगी पुढे तब्बल तीस हजार कोटींचा घोटाळा करेल हे कुणाला सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं. पण हे सगळे करण्यामागे तेलगीची भूमिका काय होती. कोणती परिस्थिती त्याला हे सगळे करण्यासाठी प्रवृत्त करत होती. त्यात त्याला कुणाची साथ मिळाली, तेलगीचे गोत्यात येणे, तपासयंत्रणांपुढे असलेला दबाव, अशा वेगवेगळ्या गोष्टींना मेहता यांनी प्रभावीपणे समोर आणले आहे.

ज्यांनी यापूर्वी मेहता यांची स्कॅम १९९२ पाहिली असेल त्यांनी स्कॅम २००३ आवर्जून पाहवी. प्रेक्षकांची निराशा होणार नाही आणि त्यांना एक वेगळी कलाकृती पाहिल्याचा आनंद नक्की मिळेल याची काळजी मेहता यांनी घेतली आहे. पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आणि त्याच्या हातून काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणून तेलगीकडे पाहता येईल. तुमच्याकडे पैसा किती का असेना पण तुमची वाईट वेळ सुरु झाली की तो पैसा काय कामाला येत नाही.

दिग्दर्शक हिरानंदानी यांनी ज्याप्रकारे वातावरण निर्मिती केली आहे त्याला तोड नाही. यावेळी मेहता यांनी अनेक मराठी कलाकारांना या मालिकेत संधी दिली आहे. त्या कलाकारांचे कामही उत्तम आहे. स्कॅम १९९२ प्रमाणे या मालिकेतील संवादही प्रभावी आहेत. एक वेगळी कलाकृती म्हणून ही मालिका पाहण्यास हरकत नाही. आपल्या देशात झालेल्या आतापर्यतच्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याचे स्वरुप यानिमित्तानं समोर आले आहे.

Scam 2003

Director - Tushar Hiranandani

Based On - Sanjay Singh's Telgi Scam: Reporter's ki Diary

Rating - ***1/2

Actor - गगन देव रायर, सना आमिन शेख, शाद रंधावा, मुकेश तिवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT