Seema Haider: Seema Haider And Sachin Got Offers To Work In Films with Producer Amit Jani  Esakal
मनोरंजन

Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आली, आता थेट हिरोईनच व्हायला निघाली!

मेरठचे रहिवासी आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला कामाची ऑफर दिली आहे.

Vaishali Patil

भारत आणि पाकिस्तानाचे संबध कसे आहेत हे सर्वांनाच माहित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मिडियात पाकिस्तानची चर्चा सुरु आहे. त्याला कारण म्हणजे पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी सर्व सीमा पार करुन भारतात आलेली सीमा हैदर.

पाकिस्तानातील आपलं घर विकून सीमा हैदर ही सचिन नावाच्या तरुणाला भेटसाठी भारतात आली. शिवाय तिने सचिनसोबत लग्न करून हिंदू धर्म स्वीकारल्याचं सांगितलं. सोशल मिडियावर सीमा हैदरची प्रेम कहाणी चांगलीच गाजत आहे. मात्र ती प्रेमासाठी आली की काही दुसऱ्या हेतूने आली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

सीमावर पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तिची आणि सचिनची चौकशी सुरु आहे. त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. सचिनची घरची परिस्थीती आधीच हालाखीची आहे त्यात आता सीमा आणि तिचे चार मुलं यांचा सांभाळ देखील सचिनलाच करायचा आहे. दोघांची चौकशी सुरु असल्यानं सीमा आणि सचिनला कामासाठी घराबाहेर जात येत नाही आहे. त्याच्या हातातील कामही गेलं आहे.

सीमा आणि सचिन यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याच्या खाण्याचे वांदे झाले आहेत अशा अनेक बातम्या व्हायरल झाल्या. आता या बातमीनंतर मेरठचे रहिवासी आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा आणि सचिनसाठी मदतीचा हात पुढे केला.

अमित जानी यांनी त्यांच्या फिल्म प्रोडक्शन हाऊस जानी फायरफॉक्समध्ये सीमाला अभिनयाची ऑफर दिली आहे. अमित जानी यांनी नुकतचं मुंबईत एक फिल्म प्रोडक्शन हाऊस स्थापन केली आहे. ते उदयपूरमधील शिंपी कन्हैया लाल साहू यांच्या हत्येवर 'A Tailor Murder Story ' नावाचा चित्रपट तयार करत आहे.

अमित जानी यांनी आता सीमा आणि सचिनला ऑफर दिली आहे त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम केले तर ते दोघांना चांगले मानधन देणार असल्याचं सांगितलं आहे.

सीमा हैदरचं चोरट्या मार्गाने भारतात येण चुकीचं आहे, असं सांगत एक भारतीय असल्याच्या नात्याने सीमा आणि सचिनच्या दोन वेळच्या जेवणासाठी मदत करण्याचं आपलं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका सहकाऱ्यामार्फत तिला कामाची ऑफर दिली असून यावर ती विचार करुन सांगणार असल्याचं सीमानं कळवलं आहे. मात्र अजून तिने ऑफरला उत्तर दिलं नसल्याचं अमित जानी यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT