Akshay Kumar
Selfiee box office collection
Akshay Kumar Selfiee box office collection esakal
मनोरंजन

Selfiee movie: 'अक्षयनं स्वप्नातही विचार केला नसेल', 'सेल्फी'च्या कमाईतुन चहा पाण्याचा खर्चही निघेना...

सकाळ डिजिटल टीम

सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा 'पठाण' चित्रपटाव्यतिरिक्त कोणताही बॉलिवूड चित्रपट फारशी कमाल करु शकलेला नाही. मग तो कार्तिक आर्यनचा शहजादा असो किंवा अक्षय कुमारचा सेल्फी..अक्षय कुमारच्या चित्रपटावरही सध्या वाईट काळ सुरू आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. त्याच्या बच्चन पांडेपासून राम सेतूपर्यंत एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही.

त्याच्या चाहत्यांबरोबरच निर्माते आणि अक्षय कुमारलाही सेल्फी या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या , पण गेल्या 10 वर्षांतील सर्वात वाईट अवस्था अक्षयच्या या चित्रपटाची झाली आहे. पहित्यल्या वीकेंडला हा चित्रपट केवळ 10 कोटींची कमाई करू शकला. पाच दिवसांत त्याची कमाई अपेक्षेप्रमाणे होऊ शकलेली नाही.

सेल्फीमध्ये अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. मात्र, इम्रानचीही काही खास जादू प्रेक्षकांना चित्रपटाकडे वळवू शकली नाही.

रिपोर्ट्सनुसार, पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सेल्फीने बॉक्स ऑफिसवर 1.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 10.30 कोटींचा व्यवसाय केला. सोमवारी या चित्रपटानं 1.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

सेल्फीनं पाच दिवसांत एकूण 13.50 कोटी रुपयाचं कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट जवळपास 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. अशा स्थितीत हा चित्रपट चित्रपटगृहातून आपल्या बजेटच्या निम्मी कमाईही करू शकेलेला नाही.

कमाईतील घसरणीचा आकाडा पाहता हा चित्रपट ३० कोटींचा आकडाही गाठू शकेल असं चित्र सध्या दिसत नाही आहे. त्यामुळे हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वात मोठं अपयश ठरला असे म्हणने वावगं ठरलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT