Shah Rukh Khan announces 'Dunki' with Rajkumar Hirani & Taapsee Pannu Google
मनोरंजन

काय आहे 'डॉंकी फ्लाइट' प्रकरण' ? राजू हिरानी-SRK चा नवा सिनेमा 'डंकी'

या 'डंकी' सिनेमाचं दिग्दर्शक सुप्रसिद्ध दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार असून यात तापसी पन्नू शाहरुखसोबत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

प्रणाली मोरे

सुपरस्टार शाहरुख खान(Shahrukh Khan)च्या नव्या सिनेमाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांत दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani)आणि शाहरुख खानच्या या सिनेमाविषयी वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत होत्या. आता निर्मात्यांनी या सिनेमाविषयी कन्फर्म माहिती देणाऱ्या बातमीची घोषणा केली आहे. शाहरुख आणि राजकुमार हिरानीच्या नव्या सिनेमाचं नाव आहे डंकी(Dunki). भारतीय सिनेमात असं पहिल्यांदाच होत आहे,जिथे बॉलीवूडचे दोन दिग्ग्ज एकत्र काम करताना दिसणार आहेत. 'डंकी' या सिनेमाच्या नावाची घोषणा निर्मात्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली असून रिलीज डेट देखील जाहिर करण्यात आली आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओत राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान दिसत आहेत.

'थ्री इडियट्स','मुन्नाभाई फ्रॅंचायजी','पीके' आणि 'संजू' सारखे मोठे कमर्शिअल सिनेमे देणारे हिटमॅन राजकुमार हिरानी पहिल्यांदा शाहरुख खानसोबत सिनेमा करणार आहेत. या सिनेमाचं नावही आता जाहिर करण्यात आलं आहे. 'डंकी' २२ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. म्हणजे शाहरुख खाननं पुढच्या वर्षीचा ख्रिसमस आताच बूक करून ठेवला आहे. जर तुम्ही विचार करत असाल की हे असं 'डंकी' नाव का बरं ठेवलं असेल तरआम्ही त्याविषयी थोडी माहिती देऊन तुमच्या मनातील शंका दूर करतो. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानींचा 'डंकी' सिनेमा 'डॉंकी फ्लाइट' कन्सेप्टशी जोडला गेला आहे. एखादया देशात जाण्यासाठी जर कुणी व्यक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असेल तेव्हा त्याला 'डॉंकी फ्लाइट' म्हटलं जातं. आता या कन्सेप्टवर बॉलीवूड सिनेमा बनत आहे,ज्याला दोन मोठे सुपरस्टार एकत्रितपणे बनवत आहेत.

जियो स्टुडिओज,रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी मिळून 'डंकी' सिनेमाला प्रेझेंट करीत आहेत. राजकुमार हिरानी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खान आणि तापसी पन्नू पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम करणार आहेत. या फ्रेश जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्येही नक्कीच असणार. 'डंकी' सिनेमाला राजकुमार हिरानी,अभिजात जोशी आणि कनिका ढिल्लों यांनी मिळून लिहिलं आहे. आणि निर्मितीची जबाबदारी शाहरुख खान,गौरी खान आणि राजकुमार हिरानी यांनी उचलली आहे.

'डंकी' सिनेमाच्या शुटिंगला एप्रिल २०२२ पासून सुरु झाल्याचं बोललं जात आहे. 'पठाण' च्या शूटिंगवरनं परत आल्यानंतर लगेचच शाहरुखनं या सिनेमावर काम करण्यास सुरुवात केली. आता डंकीच्या पुढच्या चित्रिकरणासाठी शाहरुख खान पंजाबला रवाना होणार आहे. 'डंकी' सिनेमाची बातमी कन्फर्म करताना राजकुमार हिरानी यांनी सांगितलं आहे की,'' शाहरुख खानसोबत काम करायची इच्छा माझी खूप आधीपासून होती. कितीतरी वेळा आम्ही दोघांनी एकत्र काम करायचा निर्णय घेतला पण अखेर 'डंकी'च्या निमित्तानं हा योग जुळून आला आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT