मुंबई- कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत बॉलीवूड कलाकार भरभरुन मदत करत आहेत. सगळे कलाकार छोट्या मदतीपासून ते मोठ्या गरजांपर्यंत सगळ्याप्रकारची मदत करताना दिसत आहे. बॉलीवूडचा किंग खान तर सुरुवातीपासूनंच मोठ्या मनाने मदत करत आहे. यावेळी शाहरुखने कोविड-१९ च्या विरोधातील लढाईत सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे.
शाहरुख खानने त्याच्या मीर फाऊंडेशनद्वारे लोकांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. शाहरुखने म्हटलंय, चला, कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत नेतृत्व करणा-या आरोग्य अधिका-यांसाठी आणि इतर वैद्यकीय टीमसाठी वैयक्तिक सुरक्षा साधन (पीपीई किट) मध्ये योगदान देऊन त्यांच्या कार्याचं समर्थन करुया. थोडीशी मदत खूप मोठं काम करु शकते.
शाहरुखने मीर फाऊंडेशनवर एक लिंक पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिलंय, मीर फाऊंडेशन आरोग्य सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्रभागी कार्यरत आहेत. आता तुम्हीही आमच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकता. खाली दिलेल्या क्राऊडफंडिंग लिंकवर क्लिक करुन दान करु शकता आणि आम्हाला पीपीई किट आणि वेंटिलेटर खरेदीसाठी मदत करु शकता.
शाहरुख खान याने याआधीही वेगवेगळ्या प्रकारची मदत सरकार आणि वैद्यकिय कर्मचा-यांसाठी केली आहे. त्याने पीएम केअर्स फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अघोषित रक्कम दान केली आहे तर वैद्यकिय कर्मचा-यांसाठी २५ हजार पीपीईकिट्सती मदत देखील केली आहे.
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की सध्या कोरोनाचा संसर्ग हा वाढत असून डॉक्टरांना पीपीई किट्सची कमतरता भासत आहे आणि म्हणूनंच शाहरुखने या संकटात मदत करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत लोकांना मदतीसाठी आवाहन केलं आहे..
shah rukh khan asked people to support healthcare workers amid the coronavirus pandemic
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.