Shah Rukh Khan Daughter Suhana Khan Sujoy Ghosh esakal
मनोरंजन

Shah Rukh-Suhana Khan : शाहरुख-सुहाना एकाच चित्रपटात! सुजय घोषच्या 'स्पाय थ्रिलर' मध्ये दिसणार 'बापलेक'

जवानच्या अॅडव्हान्स बुकींगलाही चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. अशातच शाहरुखबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Daughter Suhana Khan Sujoy Ghosh : शाहरुखच्या जवानची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यावर्षीच्या जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं तब्बल हजार कोटींची कमाई केली होती. आता त्याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.

तीन दिवसांपूर्वी जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला किंग खानच्या चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जवानच्या अॅडव्हान्स बुकींगलाही चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. अशातच शाहरुखबाबत एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची लेक, सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या Netflix वरील चित्रपटातून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तिचं हे पदार्पण फक्त छोट्या पडद्यापुरतं मर्यादित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनुसार सुहाना आपल्या वडिलांसोबत चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

'कहानी २' आणि 'बदला' सारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखला जाणारा सुजय घोष त्याचा नवीन चित्रपट शाहरूख आणि सुहाना सोबत करण्यास तयार असल्याचं यापूर्वीच उघड झालं होतं. पण आता IndiaToday ने दिलेल्या एका वृत्तानुसार किंग खान आणि त्याची लाडकी लेक हे एका चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

कोणत्या भूमिकेत दिसणार?

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूखची भूमिका फक्त कॅमिओ म्हणून मर्यादित राहणार नसून ,'डियर जिंदगी' मध्ये साकारलेल्या भूमिकेसारखी असणार आहे. असं म्हटलं जात आहे की, सुजयचा चित्रपट एक स्पाय थ्रिलर असून त्यात सुहाना गुप्तहेराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रत्येक गुप्तहेराला एका मदतनीसाची गरज असते आणि ही भूमिका इतर कोणी नाही तर स्वतः शाहरूख साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन (pre-production) ला सुरूवातही झाली आहे.

दरम्यान, सुहाना 'द आर्चिज' च्या रिलिजबद्दलही कमालीची उत्सुक आहे. यासगळ्यात मात्र चर्चा आहे ती शाहरुखच्या जवानची. त्याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ७ सप्टेंबरला देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

SCROLL FOR NEXT