Did Shah rukh Khan promote Marathi Movie Victoria? Video viral Google
मनोरंजन

Shah Rukh Khan: 'पठाण' च्या वादा दरम्यान शाहरुख करतोय मराठी सिनेमाचं प्रमोशन?, व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेमा 'व्हिक्टोरिया'चा दिग्दर्शक विराजस कुलकर्णीनं शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर केल्यानं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

प्रणाली मोरे

Shah rukh Khan promote Marathi Movie :सध्या शाहरुख खान 'पठाण' सिनेमामुळे वादात सापडला आहे. सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाची बिकिनीमुळे वाद पेटला आणि देशभरातून शाहरुखवर घणाघाती प्रहार केला जाऊ लागला. काहींनी शाहरुखला मारण्याची धमकी दिली तर काहींनी 'पठाण' ज्या थिएटरमध्ये रिलीज केला जाईल ते थिएटर जाळून टाकू असं म्हटलं. सेन्सॉर बोर्डानेही 'पठाण' मध्ये अनेक बदल सूचविले आहेत.

या सगळ्यावर शाहरुखनं थेट व्यक्त होणं टाळलं आहे. पण आता त्याच्या एका व्हिडीओमुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. शाहरुख मराठी 'व्हिक्टोरिया' सिनेमाचं प्रमोशन करतोय का? या चर्चेला उधाण आलंय. याविषयी आता व्हिक्टोरियाच्या दिग्दर्शकानं म्हणजे विराजस कुलकर्णीनं स्पष्टिकरण दिलं आहे.(Did Shah rukh Khan promote Marathi Movie Victoria? Video viral)

खरंतर व्हिक्टोरियाचा दिग्दर्शक विराजस मुळेच शाहरुख मराठी सिनेमाचं प्रमोशन करतोय या चर्चेला सुरुवात झाली. त्याचं झालं असं की विराजसनं शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात शाहरुख एका हॉन्टेड जागेविषयी बोलत आहे. ज्यात तो त्या जागेविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करताना दिसत आहे,

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

विराजसने अगदी तोच व्हिडीओ नेमका शाहरुखचा शेअर केला आणि लगेचच त्याला पुढे आपल्या व्हिक्टोरिया सिनेमाचा ट्रेलर जोडून दिला. आणि तो व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करत कॅप्शन दिलं की,''शाहरुख व्हिक्टोरियाचं प्रमोशन करत आहे का?'' पण लगेचच विराजसनं लोकांच्या मनात संभ्रम नको म्हणून उत्तरही देऊन टाकलं आहे.

तो म्हणालाय,'शाहरुख खान ने व्हिक्टोरिया चं प्रमोशन केलं? अजिबात नाही, पण तुम्हाला १३ जानेवारीला येऊन चित्रपट बघायला काहीच हरकत नाही! एक असा थरारक अनुभव जो मराठी चित्रपटात कधीच अनुभवला नसेल!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT