Shah Rukh Khan Dunki Movie Rajkumar Hirani Director esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : राजकुमार हिरानीच्या चित्रपटात यापूर्वी शाहरुख का नव्हता?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं आतापर्यत वेगवेगळ्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

युगंधर ताजणे

Throwback Thursday Shah rukh Khan was the First Choice for Munna Bhai Mbbs : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं आतापर्यत वेगवेगळ्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यामध्ये यश चोप्रा यांच्यापासून निखिल अडवाणीपर्यत अशी भली मोठी यादी आहे. मात्र काही दिग्दर्शकांसोबत त्याला काम करण्याची इच्छा असूनही काही कारणास्तव फिल्म करणे शक्य झाले नाही. सध्या शाहरुख मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. त्याचे कारण प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी.

राजकुमार हिरानी हे त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस पासून पीके पर्यत अशा त्यांच्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे. संजय दत्त, विद्या बालन, आमिर खान सारख्या कलाकारांसोबत राजकुमार हिरानी यांचा काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या मुलाखतीतून सांगितले आहे. या कलाकारांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं यशही मिळाल्याचे दिसून आले आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

एक गोष्ट अनेकांना माहिती नाही की, मुन्नाभाई एमबीबीएससाठी राजकुमार हिरानी यांना शाहरुख हवा होता. मात्र त्यावेळी शाहरुखनं या चित्रपटाला नकार दिला आणि नंतर त्यावरुन बोलत बसला. मला या चित्रपटामध्ये काम करायला हवा होता असे त्यानं सांगितले होते. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. शाहरुखनं त्या चित्रपटाला नकार दिला होता. त्याचे कारण त्यावेळी त्याच्याकडे असलेला दुसरा प्रोजेक्ट.

दुर्देवानं शाहरुखच्या हातून तो चित्रपट गेला. मात्र संजय दत्तनं त्या चित्रपटाचं सोनं केलं आहे. ही गोष्ट आहे मुन्नाभाई एमबीबीएसच्या प्री प्रॉडक्शनच्यावेळची आहे. त्याची निर्मिती विधू विनोद चोप्रानं केली होती. पहिल्यांदा ते लिड रोल म्हणून शाहरुखकडे गेले होते. किंग खानला त्यांनी ती गोष्टही सांगितली होती. मात्र त्यानं नकार दिला होता. शाहरुख त्यावेळी संजय लीला भन्साळी यांच्या देवदासमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले होते.

शाहरुखनं दिग्दर्शक हिरानी यांना सांगितले होते की, तुम्ही स्क्रिप्ट ठेवून जा. मी ती वाचून आपल्याला कळवतो असे सांगितले होते. शाहरुखला ती स्क्रिप्ट देखील फार आवडली होती. त्यांनी आपण या चित्रपटामध्ये काम करायला तयार आहोत असेही त्यानं हिरानी यांना कळवले होते.

आता शेवटी डंकी या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख आणि राजकुमार हिरानी हे एकत्र येणार आहेत. त्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट येत्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मेकर्सच्या वतीनं देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sydney Beach Shooting : किंकाळ्या अन् जीव वाचवण्याची धडपड! सिडनीतील गोळीबाराचा थरकाप उडवणारा VIDEO समोर...

"मी त्यांना सांगितलं बारा तासांच्या वर.." कामाच्या वेळेबाबत जेव्हा मयुरीने घेतला ठाम निर्णय, म्हणाली..

Dhurandhar Video : 'धुरंधर' 300 कोटी पार! पण रहमान डकैतच्या रोलमध्ये शाहरुख खान असता तर...व्हायरल AI व्हिडिओ पाहून चाहते शॉक

Latest Marathi News Live Update: वानखेडे स्टेडियमवर 'प्रोजेक्ट महादेवा' चा शुभारंभ, लिओनेल मेस्सीची उपस्थिती

Mumbai News: जळीत रुग्णांसाठी केईएमचा मोठा आरोग्यविषयक टप्पा! नवीन उपचार केंद्राचे लोकार्पण; काय सुविधा मिळणार?

SCROLL FOR NEXT