Shah Rukh Khan Dunki UnOfficial Remake of Malayalam Movie esakal
मनोरंजन

Dunki Controversy : साऊथच्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे 'डंकी'? शाहरुखच्या नव्या चित्रपटावरुन वादाला सुरुवात!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असल्याचे दिसून येते.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Dunki UnOfficial Remake of Malayalam Movie : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असल्याचे दिसून येते. या वर्षी त्याचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं तब्बल एक हजार कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या जवाननं देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

आता डिसेंबरमध्ये शाहरुखचा डंकी नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे करणार आहेत. शाहरुख आणि हिरानी हे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. शाहरुखच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. यापूर्वी त्याच्या टीझरला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या डंकीवरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा चित्रपट साऊथच्या एका चित्रपटाचा हिंदीतील रिमेक आहे. त्यामुळे शाहरुखचा डंकी हा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील किंग खानच्या पठाणवरुन मोठा वाद झाला होता. त्यातील एका गाण्यावरुन पाकिस्तानी गायकानं टीका केली होती.

चार वर्षांपासून शाहरुख हा मोठ्या पडद्यापासून लांब होता. मात्र त्यानं एकाच वर्षी पठाण आणि जवान सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन प्रेक्षकांना, चाहत्यांना जिंकून घेतले आहे. त्यामुळे त्याच्या आगामी डंकी नावाच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. बॉक्स ऑफिस इंडियानं केलेल्या एका ट्विटमुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजकुमार हिरानी ज्या डंकीचे दिग्दर्शन करत आहे तो प्रसिद्ध अभिनेता सलमान दकलीरच्या चित्रपटाचा रिमेक आहे.

सलमान दकलीरचा कॉम्रेड इन अमेरिका नावाचा चित्रपट आहे. शाहरुखचा आगामी डंकी चित्रपट त्याचाच हिंदी रिमेक असल्याचे बोलले जात आहे. शाहरुखचा डंकी हा यावर्षी २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे असेही बोलले जात आहे की, याचवेळी साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा सालार नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यानं डंकी आणि सालार यांच्यात टक्कर दिसून येणार आहे.

सोशल मीडियावर डंकी आणि सलमानच्या सीआए वरुन वादाला सुरुवात झाली आहे. कॉम्रेड इन अमेरिका ही एक मल्याळम फिल्म आहे. एका नेटकऱ्यान म्हटले आहे की, किमान तुम्ही आम्ही रिमेक तयार करतो आहोत असे स्पष्टपणे सांगायला तरी हवे. अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT