Shah Rukh Khan at the Mumbai Airport. Google
मनोरंजन

Video:एअरपोर्टवर असं काय घडलं की शाहरुखनं सुरक्षारक्षकासमोर हात जोडले?

शाहरुख खान 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना झाला आहे.

प्रणाली मोरे

शाहरुखला(Shah rukh Khan) ४ मार्च,२०२२ रोजी म्हणजे शुक्रवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. तो नेहमीच्याच गराड्यात दिसला. रात्री उशिरा देखील कॅमेऱ्यांनी त्याचा पिछा सोडला नाही हे व्हायरल व्हिडीओतनं दिसून येत आहे. नेहमीप्रमाणेच त्याच्या सोबत त्याच्या स्टाफचा तामझाम होताच. अर्थात शाहरुख 'पठाण'(Pathan) सिनेमाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना झाला अशी बातमी आहे. शाहरुखचा एअरपोर्ट लूक एकदम कमाल होता. डोळ्यांवर काळ्या रंगाचे सनग्लासेस,काळ्या रंगाचं टी-शर्ट,मॅचिंग पॅन्ट आणि डेनिमचं निळ्या रंगाचं जॅकेट असा पेहराव त्यानं केला होता.

शाहरुखचा एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला अन् जो-तो शाहरुखचे गोडवे गाऊ लागला. या व्हिडीओत शाहरुख त्याच्या गाडीतनं उतरताना त्याचा ड्रायव्हर लगेच गाडीतनं बाहेर येत दरवाजा उघडताना दिसत आहे. तर शाहरुख गाडीबाहेर आल्यावर सर्वप्रथम तर आपल्या ड्रायव्हरला अलिंगन देतो. हे दृश्य खरंच शाहरुखचा मोठेपणा सिद्ध करतं. तर गर्दीनं घेरलेला असतानाही शाहरुख एअरपोर्टच्या गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाला हात जोडून नमस्कारही करताना विसरला नाहीय हे प्रकर्षानं दिसून आलं आहे. या व्हिडीओला पाहून जो-तो शाहरुखच्या अशा वागण्याचं कौतूक करताना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार,शाहरुख स्पेनमध्ये पठाण सिनेमाच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे. पठाण २५ जानेवारी,२०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुखनं दोन दिवसांपूर्वीच पठाण सिनेमाचा टीझर रीलीज करत,प्रदर्शनाच्या तारखेविषयीही घोषणा केली. या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सिनेमाचा टीझर प्रदर्शित करतानाचा शाहरुखने पोस्टमध्ये लिहिलं होतं,''मला माहित आहे उशीर झाला आहे,पण प्रदर्शनाची तारीख लक्षात ठेवा. २५ जानेवारी,२०२३. हिंदी,तामिळ,तेलगू भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होत आहे''. असं त्यानं ट्वीटरवरनं जाहिर केलं होतं. सिनेमाचा टीझर बातमीत जोडला आहे. पाहिला नेसल अद्याप तर या क्रीएटिव्ह टीझरवर एक नजर नक्की टाका. यावेळी शाहरुखनं चाहत्यांसोबत दहा मिनिटाचं लाईव्ह सेशन देखील घेतलं होतं. ज्या सेशन मध्ये शाहरुखला चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले आणि त्यानंही त्यावर खूप मजेशीर उत्तरं दिली. 'पठाण' सिनेमाच्या निमित्तानं शाहरुख २०१८ नंतर सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीस येत आहे. २०१८ मध्ये तो अनुष्का शर्मा,कतरिना कैफसोबत 'झिरो' सिनेमातनं मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT