Alia Bhatt Reaction  esakal
मनोरंजन

Alia Bhatt Reaction : शाहरुख म्हणाला होता आलिया भट्ट चाहिए, आता आलियानंही दिलं कडक उत्तर, 'साऱ्या जगाला...'!

युगंधर ताजणे

Alia Bhatt Reaction Jawan Shah Rukh khan Dialogue: बॉलीवूडच्या किंग खानची गोष्टच वेगळी आहे. त्याच्या जवानची चर्चा साऱ्या जगभर होऊ लागली आहे. काल शाहरुखच्या जवानचा ट्रेलर व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. त्यातच त्या ट्रेलरमध्ये आलियाचं नाव घेतल्यानं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

चाहते तो हम आलिया भट्ट को भी, असा संवाद शाहरुखच्या तोंडी आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता आलियानं शाहरुखच्या त्या संवादावर आलेल्या प्रतिक्रियेनं पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. सात सप्टेंबरला शाहरुखचा जवान हा देशभर प्रदर्शित होतो आहे. यापूर्वी त्याच्या पठाण नावाच्या चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

खरंतर जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यातील संवादामुळे तो चर्चेत आला. त्यात शाहरुखनं बच्चे को हात लगाने से पहले बाप से पुछना चाहिए असे म्हणून आर्यन खानच्या त्या प्रकरणाला उजाळा दिला की काय अशी चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर शाहरुख खाननं एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे म्हटले गेले आहे.

त्यानंतर वानखेडे यांनी देखील शाहरुखला अप्रत्यक्षपणे जशास तसे उत्तर दिले आहे. आपण आगीशी खेळलो आहोत. त्यातून तावून सुलाखून निघालो आहोत. त्यामुळे आपल्याला कुणीचीही भीती वाटत नाही. अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी ट्विट करत दिली होती. त्यात शाहरुखच्या आलियाच्या संवादावर आलियानं देखील उत्तर दिले आहे.

आलिया म्हणते की, मला माहिती आहे शाहरुखनं माझे नाव घेतले. पण साऱ्या जगाला शाहरुख हवा आहे. अशा शब्दांत आलियानं शाहरुखचा गौरव केला आहे. शाहरुखचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जवानकडे पाहिला जात आहे. पॅन इंडिया अंतर्गत या प्रोजेक्टमध्ये साऊथचा विजय सेतुपति, नयनतारा, प्रियामणि, सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

जवान हा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या अॅडव्हान्स बुकींगला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुख आणि आलियानं यापूर्वी डियर जिंदगी या चित्रपटामध्ये एकत्रित काम केले होते. तो चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT