srk hirani 
मनोरंजन

शाहरुख खान ऑक्टोबरपासून सुरु करणार 'या' सिनेमाचं शूटींग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- किंग खान शाहरुख अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. जवळपास या दोन वर्षात शाहरुखचा एकही सिनेमा बॉक्स ऑफीसवर आलेला नाही. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या झिरो या सिनेमात तो अनुष्का शर्मासोबत शेवटचा दिसला होता. यात कतरिना कैफची देखील महत्वाची भूमिका होती. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर हवी तशी कमाई केली नाही. यात शाहरुखने बुटक्या मुलाची भूमिका साकारली होती. वेगळा प्रयत्न केल्यामुळे शाहरुखला या सिनेमाकडून अपेक्षा होती मात्र चाहत्यांना हा सिनेमा फारसा पसंत पडला नाही. 

कोरोना व्हायरच्या कारणामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात काही ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येत असून नियमही शिथील करण्यात आले आहेत. हळूहळू शूटींगला देखील सुरुवात होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सेलिब्रिटी त्यांच्या शूटींगची आतुरतेने वाट पाहत आहे.

किंग खान शाहरुख जवळपास दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयारी करतोय. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी  सिनेमात शाहरुख झळकणार असल्याचं कळतंय. हा सिनेमा स्थलांतर या विषयावर आधारित असून सोशल ड्रामा असेल.

या सिनेमासाठी शाहरुख ऑक्टोबरमध्ये शूटींग करण्याच्या तयारीत आहे. या सिनेमाचं प्री-प्रोडक्शन तोंडी सुरु करणार असल्याचं कळतंय जेणेकरुन परिस्थिती व्यवस्थित झाल्यानंतर सिनेमाच्या टीमला प्रोडक्शनचं काम करणं सोपं जाईल. शाहरुखने राजकुमार हिरानींना लेखिका कनिका ढिल्लन आणि अभिजात जोशीसोबत मिळून स्क्रीप्टवर आणखी काम करायला सांगितल्याचं कळतंय.

सुत्रांच्या माहितीनुसार, शाहरुखने हिरानी यांच्या प्लानप्रमाणे शूटसाठी तयारित राहण्यासाठी सांगितलं आहे. कारण शाहरुखला ऑक्टोबरच्या आधी काम करणं शक्य नाहीये. शाहरुखने जवळपास २० पेक्षा जास्त कथा वाचल्या आहेत. आणि अनेक निर्मात्यांसोबत तो संपर्कात आहे.   

shah rukh khan to start shooting of immigration based film with rajkumar hirani in october  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT