shah rukh khan, pathaan, deepika padukon  Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: 'पठाण'ची लायकी काढली! शाहरुखनं 'त्याची' बोलतीच बंद केली ..

Vaishali Patil

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान हा त्याच्या 'पठाण' चित्रपटासाठी जोरदार चर्चेत आहे. त्याचा चित्रपट रिलिज होण्यापुर्वीच या चित्रपटानं त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. सध्या ट्विटरवर शाहरुखच्या 'पठाण'चा ट्रेंण्ड सुरु आहे. त्याचा चित्रपट उद्या रिलिज होणार आहे.

या चित्रपटाचे जबरदस्त बुकिंगही होत आहे. हे पाहिल्यानंतर असं बोलले जात आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडणार आहे.

सध्या शाहरुख ट्विटरवर पठाणचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधताना दिसतोय. नुकतचं शाहरुखनं Ask SRK सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. ज्यात त्यानं चाहते आणि ट्रोलर्स अशा दोघांच्या प्रश्नांची उत्तरही दिली.

शाहरुख खानच्या ट्विटरवरील आजच्या आस्क सेशनमध्ये एका चाहत्याने त्याच्या किंग खानला त्याच्या चित्रपटाबद्दल एक मोठा प्रश्न विचारला. ज्यावर शाहरुखच्या उत्तराची सोशल मीडिया चर्चा रंगली आहे.

चाहत्याने शाहरुखला विचारले की तो पठाणला कुटुंबासोबत पाहू शकतो का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले की, मी फक्त माझ्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहिला आहे, त्यामुळे तुम्हीही तो पाहू शकता असं मला वाटतं.

शाहरुख खानच्या या उत्तरावर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. असं असलं तरी किंग खानचे चाहते देशातच नाही तर जगभरात आहेत, याची जाणीव सर्वांनाच आहे.

चाहते असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांना शाहरुख खान बेधडकपणे उत्तर देत आहे. शाहरुख सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. याच कारणामुळे शाहरुखला त्याच्या चाहत्यांचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळतोय.

शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम स्टार्स असणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT