Shah Rukh Khan esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : हेमा मालिनीच्या गुरु माँ यांनी केली होती शाहरुखची भविष्यवाणी, 'हा मुलगा एक दिवस...'

बॉलीवूड आणि मोठमोठे धर्मगुरु, बाबा यांचे कनेक्शन काही चाहत्यांना, नेटकऱ्यांना नवीन नाही.

युगंधर ताजणे

Hema Malini Guru Maa predicted Shah Rukh Khan stardom : बॉलीवूड आणि मोठमोठे धर्मगुरु, बाबा यांचे कनेक्शन काही चाहत्यांना, नेटकऱ्यांना नवीन नाही. यापूर्वी कित्येक कलाकारांनी जाहीरपणे आपल्या नवनवीन गुरुंविषयी चाहत्यांना सांगितले होते. काहींनी दीक्षा घेतली होती. संन्यास घेत वेगळी वाटही धरली होती. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबाबतही एक गोष्ट सांगितली जाते.

हेमा मालिनी यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखविषयी एक गोष्ट सांगितली आहे. सध्या शाहरुख त्याच्या आगामी जवान नावाच्या चित्रपटावरुन खूपच चर्चेत आहे. एका दिवसांत त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद १० कोटींपेक्षा जास्त आहे. असा विक्रम करणारा तो पहिलाच अभिनेता ठरला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. यासगळ्यात हेमा मालिनी यांनी केलेल्या त्या भाकिताची गोष्ट समोर आली आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

बॉलीवूडचे सेलिब्रेटी आणि बाबा, ज्योतिषी, गुरु आणि त्यांच्याशी असलेली जवळीक ही काही नवीन गोष्ट नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून क्रिकेटर विराट कोहलीपर्यत हे सेलिब्रेटी कोणत्या कोणत्या संत, महंत, बाबा यांच्याशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. एका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन हे सत्य साईबाबा यांचे अनुयायी होते. याशिवाय देशातील कित्येक बडे क्रिकेटस्टार यांना देखील वेगवेगळ्या बाबांविषयी अधिक आस्था होती. हे दिसून आले आहे.

हेमा मालिनी यांच्या एक गुरु होत्या. त्यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखविषयी भविष्यवाणी केली होती. ती सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या अध्यात्मिक गुरुंनी हेमा मालिनी यांना असे म्हटले होते की, तुझा सामाना आता एका मोठ्या स्टारशी होणार आहे. ही गोष्ट आहे दिल आशना है या चित्रपटाची आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुखचा दीवाना प्रदर्शित झाला होता.

दीवानानंतर शाहरुख हा बॉलीवूडचा स्टार झाला होता. त्याचा वेगळा चाहतावर्ग तयार झाला होता. त्यानं बघता बघता बॉलीवूडमध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९२ च्या दरम्यान शाहरुखन चार फिल्म साईन केल्या होत्या. त्या चारही हिट झाल्या होत्या. त्यात हेमा मालिनी यांच्यासोबतची दिल आशना है ही फिल्म देखील होती.

एका मुलाखतीमध्ये हेमाजींनी याविषयी खुलासा केला होता. त्यात त्यांच्या गुरु माँ ने शाहरुखविषयी भविष्यवाणी केली होती. आणि ती खरी झाली होती. तो खरोखरीच मोठा स्टार झाला होता. त्या प्रोजेक्टसाठी हेमाजी यांनी शाहरुखचे नाव सजेस्ट केले होते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT