sidharth malhotra - kiara advani wedding, sidharth - kiara wedding, shah rukh khan SAKAL
मनोरंजन

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding: सिद्धार्थ - कियाराच्या लग्नात शाहरुख खान करणार 'ही' खास गोष्ट

या दोघांच्या लग्नासाठी थेट शाहरुख खानचं कनेक्शन समोर आलंय.

Devendra Jadhav

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स मानले जातात. ते अनेकदा एकमेकांसोबत पार्टी किंवा इव्हेंट मध्ये दिसले आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे दोघे पुढच्या काहीच दिवसांमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सिद्धार्थ - कियाराच्या लग्नाबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या दोघांच्या लग्नासाठी थेट शाहरुख खानचं कनेक्शन समोर आलंय.

सिध्दार्थ - कियारा हे दोघे ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेर भागातील सुर्यगढ पॅलेस मध्ये लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नसाठी खास सिक्युरिटी असणार आहे. या सिक्युरिटीची जबाबदारी शाहरुख खानचा आधीचा बॉडिगार्ड यासीन खान कडे असणार आहे. यासीन सुर्यगढ पॅलेस मध्ये कियारा - सिद्धार्थच्या लग्नासाठी कडक सुरक्षा तैनात करणार आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाबद्दल अपडेट द्यायचं झालं तर या दोघांच्या लग्नासाठी ३ फेब्रुवारीपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होईल. या जोडप्याने पाहुण्यांसाठी मजेदार वाळवंट सफारी टूर आणि फूड स्टॉल्सची व्यवस्था केली आहे. जैसलमेरला भेट देणाऱ्या पाहुण्यांसाठी स्पेशल गिफ्ट म्हणून त्यांनी स्पा व्हाउचरचाही समावेश केला आहे. त्यामुळे सिद्धार्थ - कियारा दोघे त्यांच्या लग्नात खुश असणार आहेतच शिवाय लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची सुद्धा मज्जा आहे.

गेली ३ - ४ वर्ष हे सिद्धार्थ - कियारा एकमेकांना डेट करत आहेत. आता येत्या ६ फेब्रुवारीला हे दोघे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय. दोघांनी कधी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला नसला तरीही दोघांच्या लग्नासाठी त्यांचे फॅन्स मात्र आतुर आहेत. दोघांची क्युट जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कियारा आपल्याला शेवटी 'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमात दिसली, तर सिद्धार्थचा 'मिशन मजनू' सिनेमा काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT