Shah rukh Khan Google
मनोरंजन

शाहरुख खान अडचणीत,आर्यन खान नाही आता वेगळंच कारण समोर

किंग खानच्या बहुचर्चित 'पठाण' सिनेमानं त्याची चिंता वाढविल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

शाहरुख खान (Shahrukh Khan) काही महिन्यांपूर्वीपर्यंत तरी कोणत्याच कायदेशीर कारवाईमुळे चर्चेत आला नव्हता. पण शेवटी त्याच्या मुलामुळं त्याला चक्क जेलची वारीही करावी लागली,अनं कोर्टकचेरीचे धडेही गिरवावे लागले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे पुन्हा इथे त्याचा पाढा वाचण्यात काहीच अर्थ नाही. आपण मुळ मुद्दयालाच हात घालूया नं. तर शाहरुख खान पुन्हा अडचणीत आल्याची चर्चा होऊ लागली आहे. किंग खान सोबत असं नेमकं झालंय काय...चला जाणून घेऊया सविस्तर.

Shah rukh Khan,Deepika Padukone, john Abraham

तर सुरुवातीला तर शाहरुखच्या चाहत्यांचं टेन्शन थोडं हलकं करण्यासाठी आम्ही इथं स्पष्ट करतो की आर्यन खान प्रकरण किंवा आणखी कुठलं चिंता जास्त वाढवणारं प्रकरण तुमच्या लाडक्या शाहरुखच्या मागे लागलं नाही बरं का. तर किंग खान सध्या अडचणीत सापडला आहे तो त्याच्या बहुचर्चित 'पठाण' सिनेमामुळे. काय झालं असं? तर शाहरुख खान,दीपिका पदूकोण(Deepika Padukone),आणि जॉन अब्राहमचा हा सिनेमा एक स्पाय थ्रीलर(Spy Thriller) आहे. जो या नवीन वर्षात दिवाळीत प्रदर्शित होणार होता. पण आता कानावर येतंय की निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा आता दिवाळीला प्रदर्शित होणार नसल्याचं कळत आहे. सिनेमावर काही महत्वाचे सोपस्कार करणं राहिलं असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे. सिनेइंडस्ट्रीतील जवळच्या सूत्रानं ही माहिती दिली आहे,त्यामुळे ही बातमी पक्की असणार यात शंका नाही. बोललं जात आहे की,सिनेमाची नवीन प्रदर्शनाची तारीख कोणती असेल याविषयी विचार केला जात आहे. पण दिवाळीमध्ये तरी नक्कीच 'पठाण' आपल्या भेटीस येणार नाही हे निश्चित झालंय. आता निर्मात्यांच्या या निर्णयामुळे शाहरुख थोडा नाराज झाल्याचं बोललं जात आहे.

खरंतर शाहरुख खान जवळ-जवळ चार एक वर्षांनी 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून भेटीस येत आहे. त्यामुळे अर्थातच दिवाळीत 'पठाण' प्रदर्शित होणार म्हणून त्याचे चाहते खूश होते. स्वतः शाहरुख चार वर्षांनी त्याच्या या कमबॅक ला घेऊन उत्साहित होता. पण प्रदर्शनावर ब्रेक लावल्यानं आपल्या करिअरवर त्याचा परिणाम होईल का याची चिंता त्याला सतावतेय अशी बातमी आहे. 'पठाण' हा एक स्पाय थ्रीलर आहे. ज्याचं कनेक्शन सलमानच्या 'टायगर ३' आणि हृतिकच्या 'WAR2' सोबत जोडलं गेलं आहे. यश चोप्रा यांच्या यशराज प्रॉडक्शन हाऊसची ही निर्मिती असल्यामुळे हे अनोखं समीकरण जुळून येणार याची मोठी बातमी झाली होती. खरंतर शाहरुख-सलमान एकमेकांच्या सिनेमात दिसणार आहेतच,त्यात आता हृतिकचीही भर पडणार असल्याचं बोललं जात आहे.

'पठाण' सिनेमा हा एक स्पाय थ्रीलर असल्यामुळे अनेक अॅक्शन सीक्वेन्स असणार आहेत. त्यात सिद्धांत आनंद यानं आदित्य चोप्रासोबत 'वॉर' सिनेमासाठी काम केलं आहे. जो आता पुन्हा 'पठाण' सिनेमाच्या निमित्तानं आदित्य चोप्रासोबत काम करीत आहेत. हे दोघेही सध्या 'पठाण'च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहेत. VFX संदर्भात महत्त्वाचं काम सुरू आहे असं बोललं जातंय. काही स्टंट वर्कवरही तांत्रिकदृष्टया मेहनत घेतली जात आहे. आणि हे सगळं काम सुरू असल्यानं 'पठाण' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT