Shahir Shekh Instagram
मनोरंजन

Shaheer Sheikh: नशीब बलवत्तर म्हणूनच.. नाहीतर २५ जानेवारीची रात्र अभिनेता शाहीर शेखसाठी ठरली असती काळरात्र

शाहिर शेखची पत्नी रूचिकानं सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यावर बेतलेला जीवघेणा प्रसंग शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Shaheer Sheikh: प्रसिद्ध टी.व्ही अभिनेता शाहीर शेख विषयी एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. २५ जानेवारीच्या रात्री शाहीर शेख याच्या राहत्या इमारतीला आग लागल्या कारणानं खळबळ उडाली. अभिनेत्याची पत्नी रुचिका कपूरनं या घटनेविषयीची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. चा जाणून घेऊया पूर्ण प्रकरण.(Shaheer Sheikh wife ruchika share horrifying incident)

२५ जानेवारीच्या रात्री शाहीर शेखच्या इमारतीला चहुबाजूंनी आगीनं आपल्या लपेट्यात घेतलं अन् पाहणाऱ्याच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण अनेक जीव त्या इमारतीत अडकले होते. या घटनेविषयी शाहीरच्या पत्नीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्या रात्रीची मृत्यूची दहशत लोकांना सांगितली आहे.

ती म्हणाली, ''रात्री दीड वाजता मला कॉल आला की आपल्या इमारतीला आग लागली आहे. दरवाजा उघडून पाहते तर डोळ्यासमोर काळ्या धूराचंच राज्य पसरलेलं दिसलं. मला माहित होतं की आपल्याला कुणीतरी वाचवायला येईल पण त्यासाठी वाट पाहण्या पलिकडे आपल्या हातात काही नाही हे देखील कळत होतं''.

''कारण तिथून पळून जाणं अधिक धोक्याचं होतं. समोरचं विदारक दृश्य पाहून मी पुरती खचले होते. भीतीन थरकाप उडाला होता. शाहीरला कॉल करून मी संपूर्ण घटना सांगितली. मला त्याला हे सगळं सांगून पॅनिक नव्हतं करायचं, कारण मला माहित होतं हे ऐकल्यावर तो काळजीत पडणार''.

रुचिकानं पुढे लिहिलं आहे की,''माझी मुलगी फक्त १६ महिन्याची आहे. वडील व्हिलचेअरवर आहेत. त्यांना सोबत घेऊन तिथून पळून जाणं शक्यच नव्हतं. धुरापासून वाचण्यासाठी ओल्या फडक्यानं आम्ही चेहरे झाकून घेतले. त्यानंतर शाहीर आणि त्याच्या भावानं अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून आम्हाला वाचवलं''.

संपूर्ण घटना सांगताना रुचिका म्हणाली,''नशीब बलवत्तर म्हणून वाचलो आम्ही''. त्यानंतर रुचिकानं आपल्या पोस्टमध्ये अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

Celebrity react on shaheer's wife post
Celebrity react on shaheer's wife post

रुचिकाची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी यावर चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयुष्माननं पोस्ट वर कमेंट देत लिहिलं आहे की, 'आशा करतो तुम्ही सगळे ठीक असाल'. तर सोनम कपूरनं लिहिलं आहे की,'हे खूपच भीतीदायक होतं'. त्यानंतर अनिता हस्सनंदनीने लिहिलं आहे की,'तुम्ही सगळे ठीक आहात हे ऐकून बरं वाटलं'. कंगना रनौतनं लिहिलं आहे की,'तुझ्या कुटुंबाला यातनं जावं लागलं हे ऐकून खूप वाईट वाटलं'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT