Shahid Kapoor-Kriti Sanon Esakal
मनोरंजन

Shahid Kapoor: कबीरसिंग आता प्रितीसोबत नव्हे तर क्रितीसोबत..बुलेटवर रंगला रोमान्स! पोस्टर व्हायरल

Vaishali Patil

Shahid Kapoor-Kriti Sanon: बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या फर्जी या वेबसिरिजमुळे चांगलाच चर्चेत होता. त्याने या वेबसिरिजच्या माध्यमातुन ओटीटीवर धमाकेदार एंट्री केली. त्याच्या ही वेबसिरिज तुफान चालत आहे. या सिरिजने अनेक रेकॉर्ड तयार केले.

शाहिद हा नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याची चॉकलेट बॉय इमेज त्याच्या चाहत्यांना खुपच आवडते. मात्र आता शाहिद केवळ चॉकलेट बॉयच्या इमेजसाठीच नाही तर वेगवेगळ्या भुमिकासाठी चाहत्यांना आवडू लागला आहे.

शाहिद आणि राशी खन्नाची जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली. या जोडीची हा पहिल वेळ होती. आता शाहिद पुन्हा एकदा नव्या जोडीसोबत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.

सुपरस्टार शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांची जोडी लवकरच एका लव्ह स्टोरीत चित्रपटात दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा शाहिद आणि क्रिती एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या या अनटोल्ड रोमँटिक चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आला आहे.

या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.रिलीज झालेल्या पोस्टरबद्दल सांगायचे तर, शाहिद आणि क्रिती बीचवर बाइकवर रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. दोन्ही स्टार्स बाईकवर बसून एकमेकांना किस करताना या पोस्टरमध्ये दिसत आहेत.

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम पोस्ट शेअर केली. तरणच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत आहेत.

मॅडॉक चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमित जोशी आणि आराध्या या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा हा अनटायटल्ड चित्रपट या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवार पुन्हा रुग्णालयात, काळजीचं कारण नाही; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

Who Was Akku Yadav? नागपूरात तर कोर्टरूमध्येच २०० महिलांनी एकाला संपवलं होतं, महाराष्ट्र हादरवणारं अक्कू यादव हत्याकांड काय होतं?

बदलापूर-पनवेल प्रवास २० मिनिटांत, बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात; कधी खुला होणार?

MPSC recruitment: एआय, आयटीसह तीन विभागांची भरती MPSC मार्फत होणार; अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update: पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने

SCROLL FOR NEXT