Shahid Kapoor, Kiara Advani News Shahid Kapoor, Kiara Advani News
मनोरंजन

शाहीद कोणते शूज घालणार यावर ८ तास चर्चा; कियाराने व्यक्त केला मनातला राग

करण जोहरने तात्काळ कियाराचे समर्थन करीत म्हटले...

सकाळ डिजिटल टीम

Shahid Kapoor, Kiara Advani News शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी करण जोहरने होस्ट केलेल्या कॉफी विथ करण या शोच्या ७ व्या सीझनमध्ये एकत्र दिसणार आहेत. कबीर सिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली आहे. आगामी एपिसोडमध्ये कियारा अडवाणी (Kiara Advani) ही शाहिदची (Shahid Kapoor) ८-८ तास वाट का पाहावी लागली हे सांगताना दिसणार आहे.

कियारा अडवाणीने खुलासा केला की, ती तिच्या मनात शाहीद कपूरला थापड मारत होती. कारण, तिला त्याची वाट पाहावी लागली. शाहीद पुढील दृश्यात कोणते शूज घालणार यावर चर्चा सुरू होती. करण जोहरनेही कियारा अडवाणीची (Kiara Advani) बाजू घेतली आणि म्हटले की, शूजच्या चर्चेसाठी तुला शाहीदने ८ तास थांबायला लावले. शाहीदच्या बाबतीतही असेच केले पाहिजे.

शूटिंगच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मला ८ तास वाट पहावी लागली. कारण, पुढच्या सीनमध्ये शाहीद (Shahid Kapoor) कोणते बूट घालणार याची चर्चा सुरू होती, असे त्या घटनेची आठवण करून देताना कियारा अडवाणी म्हणाली. करण जोहरने तात्काळ कियाराचे समर्थन करीत म्हटले की, जर माझ्यासोबत असे केले गेले असते तर मीही मनातल्या मनात थापड मारली असती.

निर्मात्यांनी शोचे प्रोमो व्हिडिओ रिलीज केले आहेत. आता कबीर सिंगची ही सुपरहिट जोडी पुन्हा कधी एकत्र पाहायला मिळणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. शहीद कपूरने शोच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तो कियारा अडवाणीसोबत मस्ती करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT