Tamasha artist Mangala Bansode
Tamasha artist Mangala Bansode esakal
मनोरंजन

Mangala Bansode : तमाशाचं स्वरूपच बदललंय, आजच्या पोरांना छक्कड चालत नाही, मॉडेल लागते; मंगला बनसोडेंचा कोणावर निशाणा?

विजय लोहार

सध्या ‘मनुस्मृती’चे उदात्तीकरण केले जात असताना आपणास गप्प बसून चालणार नाही.

Nerle News : ‘‘रसिकांच्या मागणीवरून तमाशाचे स्वरूपच बदलले. सवाल-जवाब, छक्कड चालत नाही. आजच्या पोरांना मॉडेल लागते. आपली तमाशाकला, लोककला, शाहिरी जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील रसिकांनी पुढाकार घ्यावा,’’ अशी भावना राष्ट्रपतिपदक विजेत्या ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे (Mangala Bansode) यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी त्यांनी काळजाला भेदून जाणारी ‘पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची,’ ही लावणी सादर केली. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. वाटेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकामध्ये राज्यातील पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाच्या (FolkArt Festival) उद्‌घाटन समारंभात त्या बोलत होत्या.

अण्णा भाऊ साठे यांच्या सूनबाई श्रीमती सावित्री साठे, नातू सचिन साठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, माजी सभापती रवींद्र बर्डे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ शाहीर अंकल सोनवणे, शाहीर शीतल साठे, महेंद्र रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

शाहीर शीतल साठे यांनी ‘माझी मैना’ हे अण्णा भाऊंचे छक्कड, तसेच ‘जागा हो, जागा शाहिरीच्या मिठाला,’ गीत सादर केले. प्रारंभी अण्णा भाऊ साठे शिल्पसृष्टी व अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकामध्ये पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मंगला बनसोडे म्हणाल्या, ‘‘माझे पती रामचंद्र बनसोडे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्नेही होते. ते अण्णा भाऊंकडून कथानक घ्यायचे. त्यातून आम्ही ‘फकिरा’, ‘कृष्णाकाठचा फरारी’, ‘आवडी’, ‘डोंगरची मैना’ अशी वगनाट्ये बसविली. ती राज्यातील रसिकांनी डोक्यावर घेतली. त्याचे सारे श्रेय अण्णा भाऊंना आहे.’’

Shahiri FolkArt Festival Wategaon Sangli

डॉ. भारत पाटणकर यांनी राज्यातील पहिले शाहिरी, लोककला संमेलन वाटेगावमध्ये घेण्यामागची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘सध्या लोककला लुप्त होत आहेत. जात्यावरच्या ओव्या, मोटेवरची, हादग्याची गाणी, झिम्मा-फुगडीतील गीते बंद झाली आहेत. आपणास त्यांचा शोध घेऊन ती पुन्हा आणावी लागतील. आपणास लोककला ही आजच्या जीवनाची कला बनवावी लागेल. मंगलाताईंची ‘पोटासाठी नाचते मी’ ही लावणी लोककलेच्या शोकांतिकेचे आर्त रूप आहे.’’

प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, ‘‘आज आपण क्रांतिकारी पाऊल टाकत आहोत. येत्या पाच-दहा वर्षांत पुन्हा महाराष्ट्र उभा राहील. शाहिरांनी आपला ‘डीएनए’ काय आहे, याचा शोध घ्यावा.’’ सचिन साठे म्हणाले, ‘‘या संमेलनातून राज्यास एक नवा संदेश दिला जाणार आहे. दुसरे संमेलन अधिक व्यापक आणि मोठे करू.’’ यावेळी महेंद्र रोकडे यांनी, आता घरात बसून चालणार नाही, पुन्हा एकदा बिन्नीवर धाव घ्यावी लागेल, असे आवाहन केले.

स्वागताध्यक्ष, माजी सभापती रवींद्र बर्डे म्हणाले, ‘‘सध्या ‘मनुस्मृती’चे उदात्तीकरण केले जात असताना आपणास गप्प बसून चालणार नाही. आम्ही प्रतिवर्षी हा लोकजागर वाटेगावमध्ये घेऊन अण्णा भाऊंची जन्मभूमी साहित्यपंढरी करू.’’ कामगार नेते जयंत निकम यांनी सूत्रसंचालन केले. योगेश साठे यांनी आभार मानले.

‘मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊंचे नाव द्या’

वाटेगाव येथे शाहिरी, लोककला संमेलनात शीतल साठे यांच्या गाण्यांतून मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊंचे नाव द्यावे, असा उल्लेख झाला, तर डॉ भारत पाटणकर यांनी मुंबई विद्यापीठास लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, असा ठराव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT