MIra Rajput-Kapoor(Shahid Kapoor's Wife); Google
मनोरंजन

'लॅक्मे फॅशन वीक' मध्ये शोस्टॉपर बनलेली शाहिदची पत्नी मीरा अनेकांना खटकली

सोशल मीडियावर मीरा राजपूतचे असंख्य चाहते असले तरी तिला ट्रोल करण्यांची संख्याही काही कमी नाही.

प्रणाली मोरे

अभिनेता शाहिद कपूर(Shahid Kapoor) ची पत्नी मीरा राजपूत(Mira Rajput) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असते. २०१५ मध्ये शाहिद कपूरनं मीरा राजपूत(Mira Rajput)शी लग्न केलं,तेव्हापासून सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलॉइंगमध्ये जबरदस्त वाढ झालेली दिसून येतेय. इन्स्टाग्रामवर तब्बल ३.४ मिलियन फॉलॉअर्स असलेली 'स्टार वाईफ' म्हणून ती प्रसिद्ध आहे. तसं पाहिलं तर कुठल्याही सिनेमात तिनं काम केलेलं नाही ना कुठल्या सेलिब्रिटी कॅम्पेनचा ती भाग आहे तरीदेखील आज ती काही ब्रॅंड्सचं नेतृत्व करताना दिसते. पण जसे तिचे प्रशंसक वाढतायत,तेवढच ट्रोलर्सही. जाणून घेऊया काय म्हणालेयत ट्रोलर्स मीरा राजपूतला.

नुकतेच मीरा राजपूतने 'लॅक्मे फॅशन वीक २०२२' मध्ये समर कलेक्शनसाठी प्रसिद्द फॅशन डिझायनर आयशा रावसाठी रॅंप वॉक केला. आइस ब्ल्यू कलरच्या एम्ब्रॉयडरी लेहंग्यात ही स्टार वाइफ उपस्थितांचे डोळे दीपवून गेली. अगदी मोजकीच ज्वेलरी आणि न्यूड मेकअप अशा कॉम्बिनेशनला कॅरी करताना मीरा राजपूत आपल्या हटके लूकसाठी अनेकांची दाद देखील मिळवून गेली. मीरा राजपूत चे हे फोटो आणि व्हिडीओज् सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र तिला शोस्टॉपर बनण्यासाठी चांगलेच ट्रोल केले आहे. एका ट्रोलरने लिहिलंय,'मीरालाच का संधी दिली?' तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलंय,'इतके सगळे दुसरे फॅशन मॉडेल,आयकॉन असताना मीराच का?' तर एक प्रतिक्रिया आहे की,'प्रोफेशनल मॉडेलला का नाही घेतलं? हा नेपोटिझमचाच भाग आहे'. तर अनेकांना मीराचा 'लॅक्मे फॅशन वीक' मध्ये रॅम्प वॉकसाठी केलेला लूक आवडलेला देखील नाही. मीरा सोशल मीडियावर फारच सक्रिय पहायला मिळते. त्यामुळे अशाप्रकारे ट्रोल होणं हे तिच्यासाठी काही नवीन नाही.

काही दिवसांपूर्वी मीरा राजपूतनं रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित एका विषयावर ट्वीट केलं होतं त्याची चांगलीच चर्चा रंगली होती अन् त्या ट्वीटमुळे तिचं कौतूकही झालं होतं. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्यानं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्या कपड्यांवरुन खिल्ली उडवली असताना मीरानं त्यावर अमेरिकेविरोधात आवाजा उठवला होता. देशावर आपत्ती आली असताना राष्ट्राध्यक्ष सुटाबुटात फिरतील ही अपेक्षा करणं चुकीचं असं तिनं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT