AskSRK Session Esakal
मनोरंजन

AskSRK Session: 'तुझं गाणं व्हाईट हाउसमध्ये वाजलं! कसं वाटतयं ?, शाहरुख म्हणतो...

Vaishali Patil

Shah Rukh Khan On PM Modi White House Welcome: शाहरुख खान हा गेल्या तिन दशकांपासुन मनोरंजन विश्वाच मनोरजंन करत आहे. बॉलिवूचा बादशाह असलेला शाहरुख त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.

त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्याचे चाहते जगभर पसरले आहे. शाहरुखही त्याच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो.

त्यातच शाहरुखने नुकतिच चित्रपटसृष्टीतील त्याचा 31 वर्षाचा प्रवास पुर्ण केला. दिवाना या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर एंट्री केली होती.

या 31वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले 31 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात शाहरुखने पुन्हा एकदा ट्विटरवर एसआरके सेशन आयोजित केलं होतं. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला खुप सारे प्रश्न विचारले. शाहरुखने देखील त्याची खुपच फनी उत्तर दिली.

याचवेळी शाहरुखच्या एका चाहत्यांने त्याला तूझं गाणं अमेरिकेत वाजवण्यात आल्याच सांगतिलं

काही दिवसांपुर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. 22 जूनला ते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर शाहरुख खानच्या छैय्या छैय्या यासह अनेक भारतीय गाणी त्याच्या स्वागताच्यावेळी सादर करण्यात आली .

ट्विटरवर एसआरके सेशन दरम्यान, एका यूजरने शाहरुखला विचारले, “अमेरिकेत छैय्या छैय्यावर मोदीजींचे स्वागत झाले. यावर तूला काय म्हणायचे आहे?

चाहत्यांच्या या प्रश्नावर शाहरुखने देखील मजेशीरपणे उत्तर देत प्रतिक्रिया दिली, " जर मी तिथे डान्स करू शकलो असतो तर..... पण मला वाटतं की ते लोक आत ट्रेनने नेण्याची परवानगी देत ​​नाहीत."

शाहरुख खानच्या याच एसआरके सेशनमध्ये एका महिलेने ट्विट करत शाहरुखला भलताच प्रश्न विचारला यात ती म्हणाली की, "सर, मी जुळ्या मुलांची आई होणार आहे... मला गुडलक विश करा, मी त्यांचे नाव पठाण आणि जवान ठेवणार आहे."

यावर शाहरुखने त्या चाहतीला उत्तर देत तिचे अभिनंदन केले आणि तिला त्या मुलांचे नाव काहीतरी चांगले ठेवण्यासाठी सांगतिलं.

तर एका चाहत्याने त्याच्या मित्रासाठी शाहरुखच्या जवाण चित्रपटात काम करण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न केला. त्यावर शाहरुखने त्याला असं होवु शकत नाही हे प्रेमात समजवायचा सल्ला दिला.

शाहरुख खानचा जवान हा चित्रपट यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र आता या चित्रपटाचे प्रदर्शन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती देखील चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT