shahrukh office
shahrukh office 
मनोरंजन

शाहरूख खानने आपल्या ऑफिसचा कायापालट केला, तो कशासाठी ते तुम्ही पाहाच 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना विलगीकरण कक्ष कसे वाढवता येतील याकडेही सरकार अधिकाधिक लक्ष देत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी विलगीकरण कक्ष कमी पडू नयेत म्हणून उद्योजकांपासून ते कलाकार मंडळीही धडपड करत आहेत. काही कलाकारांनी विलगीकरण कक्षासाठी आपले ऑफिसेस देऊ केले आहेत तर काहींनी आपल्या हॉटेल्सचं विलगीकरण कक्षात रुपांतर केलं आहे. आता अभिनेता शाहरुख खाननेही पुढाकार घेतला आहे. शाहरुखने आपल्या ऑफिसची संपूर्ण इमारतच विलगीकरणासाठी महानगरपालिकेला दिली आहे. आता त्याचं हे ऑफिस विलगीकरणासाठी तयार झालं असून शाहरुखची पत्नी गौरी खानने या ऑफिसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

शाहरुखची या ऑफिसची इमारत चार मजली आहे. आणि या इमारतीमध्ये विलगीकरणासाठी लागणाऱ्या सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. हे विलगीकरण कक्ष नेमकं कसं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ गौरी खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. `या ऑफिसमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच विलगीकरणासाठी हे ऑफिस तयार झालं असून इथे सगळ्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आपण एकत्र येऊन लढायचं आहे,` असे गौरीने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे. गौरीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक बेडमध्ये एक विशिष्ट अंतर आहे. तसेच स्वच्छताही तेवढीच ठेवण्यात आली आहे. विलगीकरणासाठी हे कक्ष महत्त्वपूर्ण असणार आहे. 

सध्या शाहरुख आणि त्याची पत्नी शक्य तेवढी आर्थिक मदतही गरजुंना, कोरोनाग्रस्तांना करत आहे. आपल्या फाऊंडेशनच्या मदतीनेही तो गरजूंना मदत करत आहे. त्याशिवाय 50 हजार पीपीई किट्स त्याने दान केले आहेत. शाहरुख सध्या करत असलेली मदत कौतुकास्पद आहेच. त्याचबरोबरीने सगळेच जण त्याचं भरभरून कौतुक सुद्धा करत आहेत. शाहरुखबरोबरच रोहित शेट्टी, अक्षय कुमार, सलमान खान, सोनू सुद यांसारख्या कलाकारांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. ही कलाकार मंडळी आपाल्या परीने सरकारला तसेच चित्रपटसृष्टीतील कामगारांना मदत करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT