Shahrukh Khan Viral Video  Esakal
मनोरंजन

Viral Video: गौरी..सलमान..करण नाही तर 'हा' आहे शाहरुखचा बेस्ट फ्रेंड..किंग खाननेच केलं स्पष्ट

सोशल मीडियावर शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये किंग खाननं त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या नावाचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan चे खास मित्र म्हटले की त्या लिस्टमध्ये त्याची स्वतःची पत्नी गौरी खान,सलमान खान,करण जोहर यांची नावं समोर येतात. म्हणजे हेच इतकी वर्ष सगळे सत्य मानत आले आहेत. पण आता इतक्या वर्षांनी खुलासा होतोय की शाहरुखचा बेस्ट फ्रेंड कुणीतरी भलताच आहे.

आपली मुलं आर्यन खान,सुहाना खान आणि अब्राहम खान यांच्याशी खूप खास बॉन्ड शाहरुख शेअर करतो. एका थ्रोबॅक व्हिडीओत किंग खान आर्यन खानसोबत खेळताना दिसत आहे. यादरम्यान शाहरुख खाननं आपल्या मुलाला स्वतःचा चांगला मित्र म्हणून संबोधलं आहे. या व्हायरल व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे.

या व्हिडीओ क्लाीपमध्ये शाहरुख खान बोलताना दिसतोय की,''माझे फार मित्र नाही आहेत त्यामुळे मी माझ्या मुलाला आर्यन खानला माझा चांगला मित्र मानतो.आणि हे खरं आहे.तोच माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. माझे चार लहानपणीचे मित्र आहेत. आता तुम्हाला वाटेल आर्यन माझा मित्र म्हणून खूप लहान आहे पण मी त्याला माझा सगळ्यात चांगला मित्र मानतो. सुहाना,आर्यनची बेस्ट फ्रेंड आहे''.(Shahrukh Khan Old Video Viral, king khan reveal his best friend name)

मध्येच शाहरुखला टोकत आर्यन म्हणतो,''नाही..'', तेव्हा किंग खान हसत म्हणतो,''ठीक आहे..पण मला वाटतं माझी मुलं माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत''.

सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की-''तुमचे क्राइम पार्टनर म्हणून आधीपासनं घरातच चार सगळ्यात चांगले मित्र आहेत..आर्यन, सुहाना,अबराम आणि गौरी..तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य या ४ मित्रांना दिलं आहे. त्यामुळे त्यांनी देखील तुमच्याशी कधी शत्रूत्व नाही ठेवलं. तुम्ही एक केअरिंग हजबंड,डॉटिंग फादर,एक जोकर, एक शेफ, एक पीएस ३ प्लेयर, एक ट्रॅव्हलर..सगळंच आहात..जे बेस्ट तुम्हाला करता येईल ते तुम्ही केलं''.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे- ''शाहरुख जेव्हा तू घराबाहेर असतोस तेव्हा तुझा स्टारडम आम्ही अनुभवतो पण जेव्हा तू घरी असतोस,तुझ्या गार्डनच्या जवळ,घरातील बालकणीत कुठेही दिसतोस तेव्हा तू खूप सर्वसामान्य माणसासारखा वागतोस..तू एक असं आयुष्य जगतोस जसं एक आनंदी माणूस आपलं आयुष्य कुटुंबासोबत जगेल''.

शाहरुखच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'जवान' सिनेमात दिसणार आहे. साऊथचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक एटली या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात शाहरुख सोबत नयनतारा, विजय सेतुपति देखील दिसणार आहेत. याव्यतिरिक्त राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' सिनेमात तापसी पन्नू सोबत शाहरुख दिसणार आहे. हा सिनेमा २२ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT