shahrukh Khan replies user who call pathaan disaster, retirement of king khan Instagram
मनोरंजन

Shahrukh Khan: 'आता रिटायरमेंट घे..',. नेटकऱ्यानं डिवचल्यावर गरजला 'पठाण'

शाहरुख खाननं एका सेशन दरम्यान चाहत्यांशी संवाद साधला त्यावेळी त्याला काही ट्रोलर्सनी ट्रोलही केलं.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतोय. या संवादा दरम्यान तो चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्याचा इमानदारीनं प्रयत्न करतो.

शाहरुखनं नुकताच Ask SRK सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. ज्यात त्यानं चाहते आणि ट्रोलर्स अशा दोघांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता आपल्या सगळ्यांनाचा माहितीय की शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्या 'पठाण' सिनेमावरनं सध्या जोरदार वाद रंगला आहे.(shahrukh Khan replies user who call pathaan disaster)

'बेशरम रंग' गाण्यातील दीपिका पदूकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं हा वाद पेटला आहे. हिंदू धर्माचा अपमान या गाण्यामुळे झालाय असा आरोप देखील केला जात आहे. सुरुवातीला हा वाद एवढा मोठा होईल असं वाटलं नाही पण त्यानंतर अद्याप हा वाद थांबायचे नाव घेताना दिसत नाही. या वादामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेल्याची देखील बातमी व्हायरल होत होती पण शाहरुखनं चाहत्यांसोबतच्या संवादा दरम्यान या सगळ्या प्रश्नांना पूर्ण विराम दिला.

शाहरुख खाननं स्पष्ट काही यावर संवाद साधला नाही पण पठाण २५ जानेवारी रोजी रिलीज होईल असं जाहीर मात्र केलं. तसंच सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं देखील तो म्हणाला. एका नेटकऱ्यानं ASKSRK सेशन दरम्यानं लिहिलं की, 'पठाण तर रिलीज आधीच अडचणीत सापडला आहे. शाहरुख सर,आता रिटायरमेंट घ्या'. यावर शाहरुखनं मजेदार उत्तर देत म्हटलं, 'बाळा, मोठ्यांशी असं नाही बोलायचं'.

शाहरुख खान आपल्या या मजेदार अंदाजासाठी ओळखला जातो एका नेटकऱ्यानं विचारलं ,'जवान आणि डंकी नंतर तुमच्याकडे काय काम आहे?' तेव्हा शाहरुख म्हणाला,'माझ्याकडे फ्री टाईम आहे भरपूर'.

काही चाहत्यांनी मात्र आपण 'पठाण' ची मनापासून वाट पाहतोय असं सांगितलं. एका चाहत्यानं म्हटलं की,'शाहरुख तु आमच्यासोबत 'पठाण' पाहशील का?' तेव्हा शाहरुखनं क्षणाचा विलंब न करता म्हटलं,'' २५ ला मी थोडा बिझी असेन पण तिसऱ्यांदा सिनेमा पहायला तू थिएटरला आलास तर मी नक्कीच तुझ्या बरोबर सिनेमा पाहीन. मात्र त्याआधी दोन वेळा तुला एकट्यानं सिनेमा पहावा लागेल''.

यादरम्यान आलिया भट्टनं देखील शाहरुखच्या या AskSRK सेशनमध्ये भाग घेतला. तिनं लिहिलं की ,'तू खूप गोड आणि आदर करण्यासारखा माणूस आहेस. २५ जानेवारीनंतर तुला पठाण म्हणून हाक मारेन. बघ, मी किती क्रिएटिव्ह आहे'.

यावर शाहरुखने देखील उत्तर देत म्हटलं की,' ठिक आहे,लिटिल वन. आणि आजपासून मी तुला अम्मा भट्ट कपूर म्हणून हाक मारेन'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT