shahrukh khan to ram charan says When RRR team brings Oscar please let me touch pathaan trailer
shahrukh khan to ram charan says When RRR team brings Oscar please let me touch pathaan trailer  
मनोरंजन

Shahrukh Khan : ऑस्करच्या बाहुलीला मला हात लावू देशील? किंग खान मनपासून बोलला की टोमणा

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट काही दिवसात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच ट्विटरवर अनेकांनी ‘पठाण’चा ट्रेलर शेअर केला आहे. दरम्यान शाहरूख खान याचा एक ट्विट सध्या चांगलच चर्चेत आहे.

चित्रपट जगतातील अनेक कलाकारांनी शाहरुखच्या पठाण चा ट्रेलर त्याच्या ट्विटरवरुन शेअर करत पठाण च्या टिमला शूभेच्छा दिल्या आहेत. यात साउथचा सूपरस्टार राम चरण आणि थलपती विजय यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

यानंतर शाहरूखने ट्विट केलं आहे की, "माझ्या मेगा पॉवर स्टार रामचरणचे खूप खूप आभार . जेव्हा तुमची RRR टीम ऑस्कर भारतात आणेल, तेव्हा कृपया मला त्याला स्पर्श करू द्या!! लव्ह यू."

हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

आरआरआर ऑस्करच्या शर्यतीत

ऋषभ शेट्टीचा कांतारा, विवेक रंजन अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स, आर माधवनचा रॉकेट्री: द नंबी इफेक्ट आणि गंगूबाई काठियावाडी हेही ऑस्करच्या शर्यतीत सामील झाले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने 301 चित्रपटांची रिमाइंडर लिस्ट जारी केली आहे. यामध्ये 9 भारतीय चित्रपटांच्या नावांचाही समावेश आहे. म्हणजेच ऑस्करसाठी त्यांचे नामांकनही शक्य आहे.

या नऊ चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पात्रतेसोबतच आता हे चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनात जाऊ शकतात. गुजराती चित्रपट छोल्लो शो आणि राम चरण स्टारर तेलगू चित्रपट RRR भारतातील ऑस्करसाठी निवडले गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT