Shakti Kapoor’s son Siddhant defends himself in drug case, argues like Aryan Khan’s friend
Shakti Kapoor’s son Siddhant defends himself in drug case, argues like Aryan Khan’s friend Google
मनोरंजन

सिद्धांत कपूरने वापरली आर्यनच्या मित्राची आयडिया, ड्रग केस मध्ये करतोय बचाव

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूर(Shakti Kapoor) यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा(Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरवर(Siddhant Kapoor) रेव्ह पार्टी (rave Party) दरम्यान ड्रग्जचे(Drugs) सेवन केल्याचा आरोप लावला गेला आहे. बंगळुरातील या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यात काही जणांना अटक केली तेव्हा त्यात सिद्धांत कपूरही होता. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी सिद्धांत व्यतिरिक्त ५ अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.(Shakti Kapoor’s son Siddhant defends himself in drug case, argues like Aryan Khan’s friend)

पोलिसांच्या चौकशीत सिद्धांतने आपल्या बचावामध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खान याचा मित्र अरबाज मर्चेंटसारखी कारणं दिली आहेत. त्यानं सांगितलं आहे की त्याला त्या पार्टीत ड्रग्ज असणार आहे याविषयी काहीच कल्पना नव्हती. मंगळवारी १४ जून २०२२ रोजी,पोलिसांनी सिद्धांत कपूरशी ड्रग्ज संदर्भात चौकशी केली. बंगळुरातील एका प्रसिद्ध हॉटेलात चाललेल्या रेव्ह पार्टीत छापा टाकल्यानंतर पोलिसांनी ड्रग्जचे सेवन केल्याच्या आरोपा अंतर्गत इतरही काही जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सिद्धांत कपूरनं त्यांना सांगितलं की कोणीतरी त्याला ड्रिंक्स आणि सिगारेट दिले होते,ज्यात ड्रग्जचा समावेश होता. त्यानं आपल्या बचावात पोलिसांना सांगितलं की त्याला याविषयीची माहिती आधी नव्हती की त्याच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज कोणीतरी मिसळलं आहे. तुम्हाला ही गोष्ट माहितच असेल की २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या इंटरनॅशनल क्रुझवर एनसीबीनं छापा टाकला होता आणि तिथे ड्रग्जचा वापर केल्याच्या आरोपाखाली शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सोबतच इतरही काही जणांना अटक केली गेली होती. या केसमध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चेंटला देखील अटक केली गेली होती.

आणि त्यानं पुढे चौकशीत सांगितलं होतं की तो सिगारेट प्यायला होता आणि त्यात ड्रग्जचा समावेश होता याविषयी त्याला काहीच माहिती नव्हती. अर्थात,गेल्याच महिन्यात एनसीबीनं आपल्या चार्जशीटमध्ये आर्यन खानला क्लीन चीट दिली होती,परंतु अरबाजला मात्र अद्यापही क्लीन चीट मिळालेली नाही.

डीसीपी भीमाशंकर म्हणाले की,'' सिद्धांत कपूरनं दावा केला आहे की ड्रग्ज कुणीतरी त्याच्या ड्रिंक्स मध्ये मिसळलं होतं,याबाबत त्याला काही माहित नव्हतं. सिद्धांतनं पोलिसांना सांगितलं आहे की तो नेहमी डीजे च्या रुपात बंगळुरातील पार्ट्यांमध्ये सामिल व्हायचा. ही त्याची त्या हॉटेलमधील चौथी पार्टी होती जिथे त्याला अटक करण्यात आली. आमच्याकडे त्या पार्टीतील गेस्टची लिस्ट आणि संशयितांची नावं आहेत ज्यांची चौकशी अजून व्हायची आहे''.

पोलिसांनी सांगितलं की सिद्धांत कपूरचे बंगळुरात खूप मित्र असल्याची माहितीं त्याच्याकडूनच मिळाली आहे. पोलिसांनी सिद्धांत व्यतिरिक्त चार अन्य आरोपींचे मोबाईल जप्त केलेले आहेत. आणि मोबाईलमधील डेटा चेक करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

पोलिस या केसमध्ये ड्रग्जची तस्करी केल्याच्या अॅंगलने देखील तपास करीत आहेत. त्या लक्झुरीयस हॉटेलचा मालक आणि रेव्ह पार्टीच्या आयोजकांना यासंदर्भात नोटीसही पाठवण्यात आली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा जो मुख्य अधिकारी होता त्याला देखील चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं. पोलिसांनी रविवारी १२ जून,२०२२ रोजी बंगळुरातील हॉटेलात सुरु असलेल्या पार्टीवर छापा टाकून तिथून ७ ग्रॅम एमडीएमए आणि १० ग्रॅम मॅरिजुआनाचा साठा जप्त केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मेडिकल टेस्टमधून हे समोर आलं होतं की सिद्धांत आणि अन्य चार आरोपींनी कोकीनचं सेवन केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तोंदलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT