Shama Sikander Latest News Shama Sikander Latest News
मनोरंजन

Casting couch : शमा सिकंदर कास्टिंग काउचवर स्पष्टच बोलली; तरुण निर्माते खूप...

कास्टिंग काउच हे मनोरंजन विश्वातील एक गडद वास्तव

सकाळ डिजिटल टीम

Shama Sikander Latest News शमा सिकंदर (Shama Sikander) मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे. शमा ग्लॅमरस व सिझलिंग लूकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंचा बोलबाला आहे. शमा बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. परंतु, आता ती पुनरागमनाच्या तयारीत आहे. मात्र, शमाने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचबाबत (Casting couch) मोठा खुलासा केला आहे.

कास्टिंग काउच (Casting couch) हे मनोरंजन विश्वातील एक गडद वास्तव आहे. शमा सिकंदरलाही याचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री एका मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल बोलताना दिसली. ‘मनोरंजन क्षेत्र खूप बदलले आहे. हा बदल चांगला आहे. आजचे तरुण निर्माते खूप व्यावसायिक आहेत. ते लोकांशी आदराने वागतात. त्यांना कामाच्या बदल्यात सेक्स नको असतो’ अशी शमा सिकंदर म्हणाली.

काही दिवसांपूर्वी एका निर्मात्याला भेटली. माझ्याशी मैत्री करायची आहे, असे त्याने सांगितले. मी विचार केला की, एकत्र काम करत नाही तेव्हा मित्र कसे असू शकतो. मला संपूर्ण संकल्पना समजली. त्याला कामाच्या ऐवजी सेक्स हवा होता.

अशा गोष्टी अत्यंत असुरक्षित व्यक्तीच करू शकतात. यात काही नावाजलेले लोक आहेत. या लोकांमध्ये प्रामाणिकपणे महिलांची मने जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्याचे दिसून येते. परंतु, कास्टिंग काउच फक्त बॉलिवूडपुरता मर्यादित नाही. हे सर्वत्र घडते, अशीही शमा सिकंदर (Shama Sikander) म्हणाली.

‘इंडस्ट्रीमध्ये काही चांगले लोकही भेटले आहेत. ज्यांच्यामुळे नेहमीच सुरक्षित वाटले आहे. यासाठी बॉलिवूडला दोष देणे चुकीचे आहे. हा व्यवसाय प्रसिद्धीच्या झोतात राहतो. त्यामुळे बरीच चर्चा होते. माझ्या मते प्रत्येकामध्ये काही ना काही वाईट गुण असते.

म्हणूनच काही लोकांना असे वाटते की ते अशा प्रकारे इतर लोकांचा अपमान करतील’, अशीही शमा सिकंदर म्हणाली. शमा सिकंदरच्या आधीही अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचचे सत्य समोर आणले आहे. हे इंडस्ट्रीचे इतके काळे सत्य आहे, जे संपवण्याची नितांत गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT