Shamshera's director Karan Malhotra addresses film's failure at box office Google
मनोरंजन

Shamshera फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया,म्हणाला,'मी माफी मागतो..'

तगडी स्टारकास्ट, १५० कोटीचं बजेट असलेल्या शमशेरानं पाच दिवसांत फक्त ३६ कोटीची कमाई बॉक्सऑफिसवर केली आहे.

प्रणाली मोरे

Ranbir Kapoor रणबीर कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शमशेराकडून(Shamshera) प्रेक्षकांसोबत सिनेइंडस्ट्रीच्या देखील खूप अपेक्षा होत्या. पण २२ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर केवळ चार दिवसात आपला गाशा गुंडाळला. १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. हा सिनेमा ज्या पद्धतीनं बॉक्सऑफिसवर कमाई करतोय तो स्पीड पाहून तरी वाटतंय की हा सिनेमा १०० करोडही कमावू शकणार नाही, शमशेराचा दिग्दर्शक करण मल्होत्रा (Karan Malhota) मात्र सिनेमाला मिळालेल्या अपयशानं पार खचून गेलेला दिसतोय. त्यानं म्हटलं आहे की, या सिनेमाला मिळालेलं अपयश,लोकांनी फिरवलेली पाठ, त्यांचा राग हे सर्व मला सहन होत नाही.(Shamshera's director Karan Malhotra addresses film's failure at box office)

करण मल्होत्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शमशेराचं अपयश आणि धीम्या गतीनं सुरु असलेली कमाई यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यानं आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे,''शमशेरा माझा आहे. माझ्या प्रिय शमशेरा तु तेजस्वी आहेस. माझ्यासाठी सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर तुझ्यासाठी व्यक्त होणं गरजेचं आहे कारण ही ती जागा आहे जिथे तुझ्यासाठी प्रेम, राग, आनंद,उत्साह, अपमान सगळंच मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत तुझ्याविषयी व्यक्त न होता तुला असंच एकटंच सोडून दिलं यासाठी सर्वप्रथम मी तुझी माफी मागतो. कारण मी तुझ्याविषयीचा राग,अपमान सहन नाही करु शकलो''.

करण मल्होत्राने पुढे लिहिलं आहे,''मी असं तुझ्याशी नातं तोडून दूर राहिलो ही माझी कमजोरी होती. यासाठी माझ्याकडे कुठला बहाणा नाही आहे. पण मी आता आहे इथे,तुझ्या सोबत,तुझ्या बाजूला. मला अभिमान वाटतोय,गर्वाने म्हणावंस वाटतंय की तु माझा आहेस. आपण दोघं एकत्र मिळून प्रत्येक गोष्टीचा सामना करुया. चांगलं,वाईट सगळ्यालाच सामोरं जाऊया. आणि शमशेराची पूर्ण टीम, कलाकार सगळ्यांचेच अभिनंदन. आपल्याला प्रेम,आशीर्वाद ज्यांनी दिले ते सर्वात महत्त्वाचे, ते आपल्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही''.

Shamshera's director Karan Malhotra addresses film's failure at box office:

शमशेरा सिनेमात रणबीर कपूर,संजय दत्त, वाणी कपूर,रोनीत रॉय,सौरभ शुक्ला सारखे बडे कलाकार आहेत. १५० करोडच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा पाच दिवसांत ५० करोडपर्यंत देखील मजल मारु शकला नाही. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार शमशेराच्या कमाईत सोमवारी ६५ टक्क्यांनी घट झालेली दिसून आली. मंगळवारी तर सिनेमाची कमाई आणखीच घसरली. रिलीजच्या पाच दिवसानंतर सिनेमानं फक्त ३६ करोड कमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT