sharad ponkshe, rahul gandhi, sharad ponkshe news, rahul gandhi news SAKAL
मनोरंजन

Sharad Ponkshe: भोगा कर्माची फळं.. शरद पोंक्षे यांची राहुल गांधींवर जहरी टीका

लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे

Devendra Jadhav

Sharad Ponkshe on Rahul Gandhi News: सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

लोकसभा सचिवालयाने कायद्यानुसार राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अशातच सेलिब्रिटी सुद्धा राहुल गांधींच्या खासदारकी रद्द प्रकरणाबद्दल भाष्य करत आहेत. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना टोमणा लगावला आहे.

(Sharad Ponkshe criticism on congress Rahul Gandhi)

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

शरद पोंक्षे सोशल मीडियावर कायमच विविध सामाजिक आणि राजकीय घटनांबद्दल भाष्य करत असतात. राहुल गांधींविषयी जे राजकीय नाट्य घडलं त्याविषयी शरद पोंक्षे यांनी राहूल यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

"कर्माची फळं भोगावीच लागतात." अशा पद्धतीने ट्विट करून शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना टोमणा मारला आहे.

शरद पोंक्षे आजवर नेहमीच काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या खास शैलीत टीका करत आले आहेत.

राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रा करत देशभर फिरत होते तेव्हा पोंक्षेंनी अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कोठडी दाखवत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली होती. शरद पोंक्षे आजवर कायमच सोशल मीडियावर राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहेत.

दरम्यान राहुल गांधींची काल पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की, कोर्टाचा जो निर्णय आला त्यावरुन तुम्ही ओबीसींचा अपमान केला असा प्रचार तुमच्याविरोधात करत आहे, यावर तुमची भूमिका काय? हा प्रश्न येताच राहुल गांधी भडकले ते म्हणाले, आत्ताच्या आता पत्रकारांनी तीन वेळा याबाबत प्रश्न विचारला.

आपण इतकं थेटपणे भाजपसाठी का काम करता आहात. करत असाल तर ते देखील चर्चेद्वारे करा, जर तुम्हाला भाजपचं काम करायचं तर तसा भाजपचा बॅच छातीवर लावून फिरा.

तेव्हा मी तुम्हाला आत्ता जसं उत्तर दिलं तसंच उत्तर देईन. आम्ही पत्रकार आहोत असं दाखवू नका....हवा निकल गई क्या? एकूणच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT