Sharad Ponkshe esakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: 'पैसे संपले, आता मिठाई विकतो!' शरद पोंक्षेंचा नवा बिझनेस

काही वर्षांपूर्वी पोंक्षेंना कॅन्सर झाला होता. मात्र त्या दुर्धर आजाराला कणखरपणे सामोरे जात त्यांनी कॅन्सरवर विजय मिळवला.

सकाळ डिजिटल टीम

Sharad Ponkshe News: मराठी नाट्य, चित्रपटातील मोठं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव घेतले जाते. ते जसे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात तसेच त्यांच्या आक्रमक आणि परखड वक्तव्यासाठी सुद्धा. आता त्यांनी एक नवा व्यवसाय सुरु केल्याचे सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. चित्रपट करता करता मालिका, वेबसीरिज आणि व्याख्यानं देणं हे पोंक्षेंना आवडते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या नव्या व्यवसायाविषयी चाहत्यांना सांगितले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.

काही वर्षांपूर्वी पोंक्षेंना कॅन्सर झाला होता. मात्र त्या दुर्धर आजाराला कणखरपणे सामोरे जात त्यांनी कॅन्सरवर विजय मिळवला. दरम्यानच्या काळात पोंक्षेंनी त्यांच्या दोन आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे लेखनही केले. त्या वाचकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यासगळ्यात आपल्याला काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागल्याचे पोंक्षेंनी सांगितले होते. आपल्या जवळील पैसे संपल्यानं दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागला. त्यानंतर आम्ही काही मित्रांनी एकत्र येवून मिठाई विकण्याचा व्यवसाय सुरु केल्याचे सांगितले आहे.

रसिक वाचक-ठाणे यांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पोंक्षें यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी सहभागी झालेल्या उपस्थितांनी पोंक्षेंच्या आठवणींना मोठा प्रतिसाद दिला. ते म्हणाले, कॅन्सर झाला असे समजले तेव्हा पायाखालची जमिन सरकली. सर्वात मोठा प्रश्न हा पैशांचा होता. त्याच्या उपचारासाठी पैसे हवे होते. नेमकी त्याचीच कमतरता होती. अशावेळी आपण नवीन काही करावं असं वाटू लागलं. त्यातून एका नव्या व्यवसायाला सुरुवात झाली.

कोरोनामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. चार पाच मित्र एकत्र येवून मग आम्ही बोरिवली आणि डोंबिवलीला दोन मिठाईची दुकानं सुरु केली. असं सांगून उपस्थितांना पोंक्षें यांनी जिंकून घेतले. जेव्हा आपल्याकडे कोणतेही प्रोजेक्ट नसतात तेव्हा आपण ही मिठाई विकण्याचे काम करतो असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT