Shark Tank India 3 esakal
मनोरंजन

Shark Tank India : शार्क टँकचा ३ रा सीझन कधी येणार? प्रोमो रिलीज, यावेळी...

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या रियॅलिटी शो ने त्यांची वेगळी ओळख तयार केली आहे त्यात शार्क टँकचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Shark Tank India 3 New Promo : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या रियॅलिटी शो ने त्यांची वेगळी ओळख तयार केली आहे त्यात शार्क टँकचे नाव घ्यावे लागेल. या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील नवउद्योजकांना प्रेरणा आणि बळ देण्याचे काम या रियॅलिटी शो च्या माध्यमातून केले गेले. त्यामुळे त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. Shark Tank India 3 Season Released Date teaser

गेल्या काही दिवसांपासून शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनची चर्चा रंगली होती. या मालिकेचे चाहते सोशल मीडियावर विचारणाही करत होते. पहिल्या दोन्ही सीझनला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता तिसऱ्या सीझनलाही तितकाच जोरदार प्रतिसाद मिळेल असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. नवउद्योजकांच्या वेगवेगळ्या कल्पना, नाविन्य, संशोधन याला मिळणारं व्यासपीठ म्हणून शार्क टँककडे पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीपासूनच या शो कडे नेटकऱ्यांचा, प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

सीझन दोन चे विनिता सिंह, अमन गुप्ता, नमिता थापर, अमित जैन, पियुष गोयल आणि अनुपम मित्तल यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिसऱ्या सीझनमध्ये नवीन जज म्हणून कोण दिसणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मेकर्सनं आता शार्क टँक इंडियाच्या ३ ऱ्या सीझनसाठी रजिस्ट्रेशनही सुरु केले आहे. त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत.

शार्क टँक इंडिया ३ चा प्रोमो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. त्या प्रोमोमध्ये एका उद्योगपतीला बिझनेसमन टायकून ऑफ द इयरची ट्रॉफी दिली जाते. त्या प्रोमोमध्ये तो सांगतो की, मी घर सोडून आलो होतो. खिशात फक्त दहा रुपये होते. आणि पँटच्या खिशात होता एक लाख रुपयांचा चेक. बँक अकाउंटमध्ये वडिलांकडे ५० लाख होते. अशावेळी मला जी वाट तयार करावी लागली ते खूपच भन्नाट होते. त्या प्रोमोची चर्चा होताना दिसत आहे.

ती व्यक्ती नवउद्योजकांना शार्क टँकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो आहे. शार्क टँकच्या तिसऱ्या सीझन प्रदर्शित होण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. यानंतर मेकर्सनं तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल याविषयी सांगितले आहे. तुम्ही तुमची आयडिया मेकर्सपर्यत पोहचवणे गरजेचे आहे. त्यांना जर ती आवडली तर ते तुमच्याशी संपर्क करतील. असे सांगण्यात आले आहे.

प्रोमोमध्ये तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शार्क टँकचा दुसरा सीझन हा १० मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT